• Sat. Sep 21st, 2024
ग्राहकांनो, टॅक्सी, रिक्षा चालक भाडं नाकारतात? मग हा नवा नियम जाणून घ्या; हमखास येईल कामी

Mumbai Traffic : अनेकदा रिक्षा चालक प्रवाशांचं भाडं नाकारत असल्याचे प्रकार समोर येत असतात. कधी जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक पैसे घेणं किंवा थेट भाडं नाकारणं अशा घटना घडताना दिसतात. पण आता अशा मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांना चांगलाच चाप बसणार आहे. ऑटो-टॅक्सीमध्ये बसवण्यासाठी मनाई करणाऱ्या चालकांचं लायसन्स रद्द किंवा निलंबित केलं जाणार आहेत.

अनधिकृत रिक्षा चालकांविरोधात पोलिसांना अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. रिक्षात बसवण्यासाठी मनाई केली जाते. तसंच ते त्यांचा ड्रेसकोड, बॅचदेखील घालत नाहीत. ठरलेल्या प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी रिक्षात घेणं, जवळच्या प्रवासासाठी अधिक पैसे घेणं अशा अनेक तक्रारी आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेत ट्रॅफिक पोलीस पुढील आठवड्यापासून खास अभियान सुरू करणार आहेत.

रिक्षा चालकांना बसणार चाप

रिक्षा चालकांना बसणार चाप

वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांजवळ बेकायदेशीरपणे वाहनं उभी करणाऱ्या, ठरलेल्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक प्रवासी बसवणाऱ्या, डबल पार्किंग करणाऱ्या आणि इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं निवेदन आरटीओकडे पाठवलं जाणार आहे.

४० हजारहून अधिक चलान कापले

४० हजारहून अधिक चलान कापले

मोटार वाहन कायद्याच्या कलम १७९ अन्वये ठरलेल्या संख्येपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अधिकतर वाहन बांद्रा पूर्व आणि पश्चिमेकडील चालक, अंधेरी पश्चिम, जुहू, सांताक्रूझ, कांदिवली पूर्व, मानखुर्द सामील आहे. मागील आठवड्यात ट्रॅफिक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आरोपात बोरिवली आणि बांद्रा क्षेत्रात २५७ वाहन चालकांविरोधात कारवाई केली होती. यात २२१ ऑटो चालकांविरोधात दंड वसूल करण्यात आला होता. तर १७० चालकांवर प्रवाशांना भाडं नाकारल्याबद्दल आणि त्यांना त्यांच्या गंत्यव्य स्थानावर पोहोचवण्यास मनाई केल्याच्या आरोपात कारवाई करण्यात आली होती.

३० ते ६० रुपये अतिरिक्त भाडं

३० ते ६० रुपये अतिरिक्त भाडं

उपनगरीय भागात कुर्ला, बांद्रा आणि अंधेरीमध्ये ऑटो चालकांनी प्रवाशांना सर्वाधिक त्रास दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत याबाबतची माहिती दिली आहे. बांद्रा स्टेशन ते बीकेसी जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून ३० ते ६० रुपये अतिरिक्त वसूल केले जातात. कमी अंतरावर असलेल्या १५ रुपये ठरलेल्या भाड्याशिवाय १५ ऐवजी ३० ते ४५ रुपये चार्ज केले जातात. त्यावरही आता कारवाई केली जाणार आहे.

चाकू दाखवणारा ऑटो चालक अटकेत

चाकू दाखवणारा ऑटो चालक अटकेत

गोरेगाव पोलिसांनी चाकू घेऊन फिरणाऱ्या आणि एका बाईक चालकाला चाकू दाखवून त्याला शिवीगाळ करणाच्या आरोपाखाली ४५ वर्षीय अब्दुल शेखला अटक करण्यात आली आहे. शेख बांद्र्यातील रहिवासी असून ट्रॅफिक पोलिसांनी शेखची ऑटो जप्त केली असून ३ हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे. तर आरोपी चालकाचं लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे रिक्वेस्ट पाठवण्यात आली आहे.

काय आहे कायदेशीर तरतूद

काय आहे कायदेशीर तरतूद

मोटार वाहन कायद्याच्या कलम १७९ नुसार, कागदपत्रं दाखवताना चालकांनी वाहतूक पोलिसांशी गैरवर्तन केलं किंवा भांडण केलं, तर अशा परिस्थितीत २००० रुपयांचं चलान कापलं जाऊ शकतं. त्यामुळे गाडी चालवताना नियमांचं पालन करणं आणि कागदपत्र जवळ बाळगणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed