• Sat. Sep 21st, 2024
Pune News : पुण्यातल्या बळीराजाची पंचक्रोशीत चर्चा; अख्ख्या गावासाठी ठेवलं जेवणं; कारण वाचून कराल सलाम

भोर, पुणे : शेतकरी आणि बैलाचं नात हे बाप आणि मुलाप्रमाणे असतं. शेतकरी बैलाचा मुलाप्रमाणे सांभाळ करत असतो. मात्र, जेव्हा म्हातारा होऊन तो बैल शेतकऱ्याला सोडून निघून जातो. तेव्हा त्या बैलाच्या ऋनातून मुक्त होण्यासाठी काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. मात्र, पुण्यातल्या भोरमधील गवडी गावाच्या एका शेतकऱ्याने बैलाचे ऋण फेडण्यासाठी चक्क त्याचा तेराव्याचा विधी घातला आहे. बाजीराव रामभाऊ साळुंके असं या शेतकऱ्याचं नाव आहे.भोर तालुक्यातील बाजीराव साळुंखे यांच्या या ” पाखऱ्या” या बैलाचे २७ एप्रिलला वृद्धपकाळाने निधन झाले. त्याच्यासाठी काय करावे असा प्रश्न त्याच्या समोर होता. या शेतकऱ्याने माणसाचा जसा तेरावा घालतात त्याचप्रमाणे विधिवत तेरावा घातला आहे. या तेराव्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Crime: अख्खं शहर होतं धोक्यात! पोलिसांचा अचानक बंद घरावर छापा; दारूच्या बाटल्यांचा खच पण…
भोर तालुक्यातील गवडी गावात राहणारे साळुंखे हे शेतकरी कुटुंब. त्यांनी १९९८ पासून स्वत:च्या मुलाप्रमाणे त्यांचा “पाखऱ्या” नावाचा बैलावर जीव होता. त्या बैलानेदेखील आपल्या शेतकरी असलेल्या मालकासोबत उन्हातान्हात काम केलं. गेली २५ वर्ष त्याने शेतकऱ्यांसोबत एकत्र काम केलं. शेवटी बैल वृद्ध झाला. त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचा विधिवत तेरावा घातला आहे.या दिवशी विधिवत पूजा करून संपूर्ण गावातल्या नागरिकांना तेराव्याचं जेवण घालण्यात आलं. यावेळी गावातील १३ बैलांना हार घालून त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घातला. इतकंच नाहीतर बैलांना मुरकी हा साज देण्यात आला. या तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता. त्यामुळे शेतकरी आणि त्याच्या बैलाच्या नात्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

मुंबई एअरपोर्टवरून चप्पला बदलापूरला जाणार होत्या, पोलिसांनी तपासताच चक्रावले; हाती लागलं १ कोटींचं घबाड
पाखऱ्या या लाडक्या बैलाचा माणसांप्रमाणे तेरावा विधी केला. २५ वर्षे मुलाप्रमाणे संभाळलेल्या पाखऱ्या बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. विधिवत पूजा करून, १३ बैलजोडींना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळी बैलांना खाऊ घातली. तसेच बैलांना मुरकी हा साज देण्यात आला. बैल मालकांना टॉवेल टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तेराव्याला संपूर्ण गावाला पुरणपोळीचे गाव जेवण देण्यात आलं. तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते.परिसरात सध्या शेतकरी बाजीराव साळुंके आणि त्यांच्या बैलाच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

Jalgaon Crime: तरुणीने भर रस्त्यात तरुणावर सपासप फिरवला चाकू, घटनेचा VIDEO व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed