• Sun. Sep 22nd, 2024
विद्यार्थांना सरकारमार्फत गणवेश, कापड व्यापाऱ्यांचा मात्र विरोध, आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर : शालेय शिक्षणासंबंधी सरकारकडून अनेकदा विविध निर्णय घेतले जातात. त्याचे पडसाद विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील संबंधित मंडळींमध्ये उमटत असतात. यावेळी मात्र गणवेशासंबंधीच्या प्रस्तावित नियमाला कापड व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचा गणवेश सरकारमार्फत पुरविल्यास कापड व्यापाऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये, अन्यथा व्यापारी आत्मदहन करतील, असा इशारा अहमदनगर होलसेल व्यापारी गारमेंट असोसिएशन व शिवराष्ट्र सेना या संघटनेने दिला आहे.महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडली आहे. अहमदनगर होलसेल व्यापारी गारमेंट असोसिएशन व शिवराष्ट्र सेना या पक्षाचे व्यापारी आघाडी अध्यक्ष विजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेतली. निखील गांधी, पारस कासवा, बाबुशेठ चूग, प्रकाश सराफ, संतोष गुगळे, संकेत गांधी, राजेश आहुजा, प्रदीप आहुजा, नवनाथ मोरे अरुण चव्हाण परदेशी असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

१.८ कोटींच्या सोन्याची पेस्ट केली, जीन्समध्ये लपवली, तरीही तस्कराला विमानतळावर पकडलेच
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना एकच प्रकारचा, रंगाचा गणवेश शिवण्यासाठी राज्य पातळीवरून कापड पुरवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे सध्या व्यापार्‍यांकडे पहिलेच शिवून पडलेल्या रेडीमेड कपड्यांचा साठा पडून राहील. सर्वच दुकानात मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च करून गणवेश तयार करून घेतले आहेत. यासाठी अनेकांनी कर्जही काढले आहे.

धक्कादायक! १३ वर्षीय मुलीच्या पोटात दुखले, डॉक्टरांकडे तपासताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
व्यापाऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

नव्या पद्धतीने गणवेश पुरवठा झाला तर हा माल कोणीही घेणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. व्यापार्‍यांना शेतकर्‍यांसारखेच आत्महत्याला सामोरे जावे लागणार लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, शासनाने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक एका महिन्यात इतके लाखो ड्रेस शिवून होतील का? हा प्रश्न आहे. या आधीच महाराष्ट्रातील होलसेल व्यापार्‍यांनी सहा महिन्यापासून तयारी करून व लाखो रूपयांचे कर्ज काढून मोठ्या प्रमाणात ड्रेस शिवून ठेवलेले आहेत.

धक्कादायक! NEET परीक्षेत मुलींच्या थेट अंतर्वस्त्रांची केली तपासणी, उघड्यावर कपडे बदलण्यास भाग पाडले
शिक्षण मंत्री यांनी एकाच रंगाचा ड्रेस असावा व तो राज्य शासनाकडून घ्यावा असे सांगितले आहे. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा अन्यथा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने कापड बाजार व्यापारी होलसेलला पाठिंबा देऊन आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed