पुणे : राज्यात अनेक शहरांमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. आता पुणेकरांनाही पाणीकपातीचा सामाना करावा लागणार आहे. येत्या १८ मे पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यंदा सर्वसाधारण पाऊस आणि अल निनो सक्रिय राहण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.यंदाचा पावसाळा सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आणि एल निनोच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्यानेही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. महापालिकेनेही तशी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune News : आयटी कंपनीत आगीवेळी दोन हजार कर्मचारी, धुराचे लोट बघून धडकी भरली
राज्यात धरणांमध्ये ३६ टक्के पाणीसाठा, पुण्यात सर्वात कमी पाणी
राज्यात उन्हाची तीव्रत वाढत असताना दुसरीकडे राज्यातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर आला आहे. तर राज्यात पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे फक्त २८.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे शेतीसह उद्योगांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर राज्यात यंदा सर्वाधिक पाणीसाठा हा अमरावती विभागात आहे.Pune News : पुण्यात मोठी घटना, विमाननगरमधील एका आयटी हबच्या चौथ्या मजल्यावर आग
कुठल्या भागात किती पाणीसाठा?
महाराष्ट्रात तीन हजार धरणांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात फक्त २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राधानगरी धरणात ३३ टक्के, चांदोली धरणात ३९ टक्के तर कोयना धरणात फक्त ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.