• Sat. Sep 21st, 2024
ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार

पिंपरी चिंचवड : कुणाला मृत्यू कुठे गाठेल, हे सांगू शकत नाही. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बससमोर तिचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनिक विभागातील सहाय्यक शिल्पा कैलास गेडाम (वय ३८ वर्ष) यांचा दोन्ही बसच्यामध्ये चिरडून दुःखद अंत झाला.पिंपरीतील वल्लभ नगर बस आगारातील एसटी बाहेर काढताना बसचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे ती समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन धडकली. त्यावेळी एसटी विभागतील महिला कर्मचारी त्या बसचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या होत्या. या दोन्ही बसच्या मधोमध सापडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

शिल्पा कैलास गेडाम (वय ३८) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वल्लभनगर बस आगारामध्ये परतूर आगाराची बस पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी चालक बऱ्याच वेळापासून प्रयत्न करत होता. मात्र समोर बस असल्याने त्याला गाडी काढता येत नव्हती. मात्र त्यावेळी परतूर आगाराच्या बसचा वाहक अहमदपूर आगाराच्या बस चालकाच्या सीटवर बसला आणि बस सुरू करून त्याने बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या बसचा ब्रेक न लागल्याने ती बस समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन जोरात आदळली.

आई आम्ही येतो गं! माऊलीचा आशीर्वाद घेऊन कुटुंब निघाले, पण कोणीच परतलं नाही; ११ जणांचा अंत
त्या बसमधील ऑईल शिल्पा या चेक करत होत्या. बसच्या पुढच्या बाजूला असल्याने त्या दोन्ही बसच्या मधोमध अडकल्या गेल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांचा कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

एसटी चालकाचा महामार्गावर अंदाज चुकला अन् बस थेट रस्ते दुभाजकावर चढली; ४७ प्रवासी थोडक्यात बचावले

शिवशाही बसला धडक दिल्यामुळे समोरच्या बसच्या काचा देखील फुटल्या. पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

कुलदेवतेच्या दर्शनाला निघालेल्या नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, करवलीचा मृत्यू
या प्रकरणी प्रशांत रमेश वाडकर (वय ३३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत वसंत यमाजी रावते यांनी फिर्याद दिली आहे. दुसऱ्या गाडीच्या चालकाची परवानगी न घेता वाहक त्या गाडीत चालकाच्या सीटवर बसून असे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed