• Thu. Nov 28th, 2024
    लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट, पुण्यात पत्नीनेच दिली पतीला पोटगी

    Pune News Today: पत्नीच पतीला पोटगी देणार असल्याची घटना पुण्यात घडली आहे. कौटुंबिक न्यायालयात सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी हा निकाल दिला

     

    म. टा. प्रतिनिधी, पुणेः घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेल्या पत्नीला उच्चशिक्षित बेरोजगार पतीला एकरकमी ५० हजार रुपये पोटगी द्यावी लागली. शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी हा निकाल दिला.सागर आणि सागरिका (नावे बदललेली) असे जोडप्याचे नाव आहे. त्यांचा ऑगस्ट २०१८मध्ये विवाह झाला होता. कौटुंबिक वाद झाल्याने ते जून २०२०पासून विभक्त राहत होते. सागर यांनी ‘बीटेक’चे शिक्षण घेतले आहे. सागरिका यांनी ‘एमटेक’ची पदवी मिळवली आहे. त्या एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतात. सध्या सागर बेरोजगार आहे. दोघांत वाद झाल्याने सागरिका यांनी घटस्फोट मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यात न्यायालयाने पोटगीचा अंतरिम आदेश दिला होता. मात्र, पोटगी मिळण्यासाठी सागरिकाने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेल्याचे सागरने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबतची तक्रारही दाखल केली होती.

    सागरने त्याला नोकरी नसल्याने पत्नीनेच पोटगी द्यावी, असा अर्जही दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तडजोडीने दावा निकाली काढण्याबाबत विचारणा केली असता, सागरिकाने तडजोडीची तयारी दर्शवली होती. तिने सागरला पोटगी देण्यास होकार दिला. त्यानंतर तडजोडीने हे प्रकरण निकाली काढण्यात आले. पतीच्या वतीने ॲड. नरेंद्र बाबरे यांनी युक्तिवाद केला.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed