• Sat. Sep 21st, 2024
करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान, किंमत तब्बल…

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला देशभरातील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. अशाच एका भक्ताने आई अंबाबाई देवीला सुमारे ४७ तोळे सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. हे किरीट तब्बल २४ लाख रुपये किमतीचे आहे. हा झगमगीत मुकूट शनिवारी देवीला चढवण्यात आला आहे.साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आई अंबाबाईचे दर्शन मिळावे यासाठी तासान्-तास रांगेत उभे राहतात. यावेळी भक्तगण आपापल्या परीने शक्य असेल तेवढे दान देखील करतात. जालना येथील अध्यात्मिक संस्थानाने शुक्रवारी ४७० ग्राम वजनाचे शुद्ध सुवर्णजडित किरीट अर्पण करायचे ठरवले होते.

यासाठी संस्थानाचे पुजारी आणि काही पदाधिकारी शनिवारी किरीट घेऊन अंबाबाईच्या मंदिरात आले होते. त्यांनी तो मुकूट देवीला अर्पण करून दर्शन घेतले. या किरिटाची अंदाजे किंमत २४ लाख रुपये असून या किरिटाचे देवीच्या पायातून पूजन देखील करण्यात आले. यानंतर किरीट देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. तर समितीने साडी चोळी व प्रसाद देऊन या भाविकांचा सत्कार केला.

Honey bee attack : पार्थिव सरणावर रचले, इतक्यात मधमाश्यांचे मोहोळ उठले, स्मशानभूमीत ४२ जण जखमी
देवीला दर वर्षी मोठ्या प्रमाणात सोने चांदी आणि पैशाच्या रूपात देणगी मिळत असते. गेल्या काही वर्षात यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून काही महिन्यांपूर्वी कोलकाता येथील एका भक्ताने ३२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा किरीट अर्पण केला होता, तर कराड येथील अभिजीत पाटील यांनी पाच तोळे वजनाचे स्वर्ण किरीट देवीला अर्पण केले होते.

अंबाबाई मंदिरातील असं एक मंदिर जे अनेकांना माहीत नाही; वर्षातून ३ वेळा मंदिराचा दरवाजा उघडला जातो

देवीच्या खजिन्यात निजामकालीन तसेच संस्थानकालीन अनेक दागिन्यांसह देवीच्या नित्यालंकारांचा समावेश आहे. खजिन्यात सुमारे शंभर किलोहून अधिक सोने आणि चांदी आहे. गव्हर्मेंट व्हॅल्युएटर मार्फत देवीला अर्पण केलेल्या सर्व मौल्यवान दागिन्यांची तपासणी केल्यानंतर ते खजिन्यात जमा केले जाते अशी माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.

कुलदेवतेच्या दर्शनाला निघालेल्या नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, करवलीचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed