• Mon. Nov 25th, 2024

    शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते

    शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते

    जळगाव : आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.यावल तालुक्यातील न्हावी येथे गिरधर खिलचंद नेहते हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. ५ मे रोजी गिरधर हा नेहमीप्रमाणे शेतात गेला. यादरम्यान गिरधर याने त्याच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. शेतात इतर कुणीही नसल्याने विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला. उशीर होवूनही गिरधन हा परत न आल्याने कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली.

    उबर गाडीने मावशीसोबत फिरायला आला, धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरला, डोळ्यासमोर घडले धक्कादायक
    विहिरीत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

    जेव्हा त्यांनी शेतात शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असल्याचे दिसले आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याने शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळाल्यावर फैजपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामस्थांच्या मतदीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ मोहीनी भुगवाडया यांनी गिरधन यास तपासून मृत घोषित केले.

    मोठा अनर्थ टळला, ४७ प्रवासी घेऊन भरधाव लालपरी चढली दुभाजकावर, प्रवाशांचा उडाला थरकाप
    आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट

    मृत तरुण शेतकरी गिरधर नेहेते यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. वडिलांच्या मृत्यूने एकुलत्या एक मुलाचे पितृछत्र हरपले असून गावात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेची खबर फैजपूर पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फैजपूरच्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश बऱ्हाटे करीत आहे.
    ऐकावं ते नवलंच! बकरीला बोकडाचे लिंग शिवून तो विकत होता मटण; असा झाला भांडाफोड

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed