अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथे राज्यातील प्रथम ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या महिला केसरी स्पर्धेसाठी १० राज्यांतून ९०० स्पर्धक अकलूज येथे दाखल झाले असून पुढील ३ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. पुरुष महाराष्ट्र केसरी स्पर्धकांना जशी सरकारी नोकरी मिळते, तशी महिला केसरी विजेतीस सरकारी नोकरी देण्याची मागणी यावेळी केली जात आहे. प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने उपस्थिती लावली.राज्यात प्रथमच ताराराणी महिला केसरी स्पर्धेचे उद्घाटन अकलूज येथे झाले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्यासह सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , संयोजिका शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी महिला केसरी विजेती महिला कुस्तीगीर स्पर्धकांस राज्य सरकारने नोकरी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ महिला कुस्तीगीर ज्योत प्रज्वलित करून झाला. पुढील ३ दिवस मॅटवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्रासह १० राज्यातून ९०० महिला कुस्तीगीर पहिल्या महिला केसरी स्पर्धेसाठी अकलूज येथे दाखल झाल्या आहेत.
ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ महिला कुस्तीगीर ज्योत प्रज्वलित करून झाला. पुढील ३ दिवस मॅटवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्रासह १० राज्यातून ९०० महिला कुस्तीगीर पहिल्या महिला केसरी स्पर्धेसाठी अकलूज येथे दाखल झाल्या आहेत.
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं ढिसाळ नियोजन; टाळ्या-शिट्ट्यांनी दुमदुमणारं खासबाग मैदान सुनं दिसलं
विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी आलेल्या महिला कुस्तीगरांची क्रीडा संकुलसह अकलूज इथे हलगीच्या निनादात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. पुरुषांच्या असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेप्रमाणे भव्य दिव्य आणि नेटके असे नियोजन अकलूज येथे ताराराणी महिला केसरी स्पर्धेसाठी करण्यात आले आहे.
यावेळी या स्पर्धेच्या संयोजिका शितलदेवी मोहिते पाटील यांनी पुरुष महाराष्ट्र केसरी विजेत्यास ज्या पद्धतीने सरकारी नोकरी मिळते. अगदी त्याच पद्धतीने महिला केसरी विजेती स्पर्धकांना सरकारी नोकरीमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.