• Mon. Jul 6th, 2026

    गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ड्रग्सच्या मुद्द्यांवरून सरकारवर केली टीका

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  ड्रग्सच्या मुद्द्यांवरून सरकारवर केली टीका

    मुंबई

    मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. राज्यातील तरुण-तरूणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

    राज्यावरील कर्ज वाढले

    राज ठाकरे यांनी म्हटले की गेल्या काही वर्षांमध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते, मात्र त्यानंतर आतापर्यंत 11 लाख कोटी कर्ज झाले आहे. असं असलं तरी शहरे कोलमडून पडली आहेत. पिज्जा 10 मिनिटात येतो, पण सामान्य मानसाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही फुटपाथ जाम आहेत, सगळीकडे ट्रॅफिक आहे. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येऊ इच्छित आहेत, मात्र शहराचे नियोजन नाही.

    तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत

    पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, मात्र संपूर्ण राज्यात ड्रग्स विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्स जातायेत, शाळांमध्ये ड्रग्स जातायेत. तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. काय करणार आहोत आपण महाराष्ट्राचं. ग्रामीण भागात प्रगती होत नाही, ग्रामीण भागातील मुलं-मुली शहरात येत आहेत, शहरं बकाल पडली आहेत. शहरामध्ये ड्रग्स मिळत आहेत, लहान मुली मुलं पळवली जात आहेत.

    मुलं बेपत्ता होतायेत…

    राज ठाकरे यांनी लहान मुलांच्या गायब होण्याची आकडेवारी सादर केली. त्यांनी म्हटले की, नोहेंबर डिसेंबरमध्ये 36 दिवसांमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली आहेत. त्याआधी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात नवी मुंबईत 499 मुलं बेपत्ता झाली होती, महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मुले पालकांना मिळाली, मात्र त्यातील 41 मुलं बेपत्ता आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी 4500 ते 5500 मुलं बेपत्ता होतात. 2022 मध्ये 5398 आणि 2023 मध्ये 4619 मुले बेपत्ता झाली आहेत. यात मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत दरवर्षी 2000 पेक्षा जास्त होतात अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed