• Mon. Jul 6th, 2026

    युद्धाच्या 20व्या दिवशी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका 

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    युद्धाच्या 20व्या दिवशी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका 

    अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या 20व्या दिवशी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे. इराणने प्रथमच अमेरिकेच्या स्टेल्थ फायटर जेट F-35 Lightning II हवेत उडवलं आहे. यामुळे त्या अमेरिकन लढाऊ विमानाला आपत्कालीन लँडिंग करावी लागली. सूत्रांच्या हवाल्याने CNN ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एका अमेरिकन F-35 विमानाला मिडल ईस्टमधील अमेरिकन एअर बेसवर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या विमानावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इराणच्या IRGC ने देखील अमेरिकन फायटर जेटला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

    अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले की, फिफ्थ जनरेशन स्टेल्थ जेट इराणच्या वर कॉम्बॅट मिशनवर असताना त्याला हिट करण्यात आले. त्यानंतर जेटची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. त्यांनी विमान सुरक्षितपणे उतरले असून या घटनेची चौकशी सुरू आहे. टिम हॉकिन्स यांनी पुढे सांगितले की, ‘विमान सुरक्षितपणे उतरले आहे आणि पायलटची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे.’

    समोर आलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संघर्षात इराणने प्रथमच अमेरिकन फायटर जेटला लक्ष्य केले आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्रायल दोघेही F-35 सारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा वापर करत आहेत. या विमानाची किंमत सुमारे 100 मिलियन डॉलर (800 कोटी रुपयांपेक्षा अधिक) आहे.

    ही घटना का महत्त्वाची आहे?

    ही घटना अनेक कारणांमुळे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पहिल्यांदाच इराणने थेट अमेरिकन विमानाला लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. यावरून इराणची हवाई संरक्षण क्षमता अजूनही प्रभावी असल्याचे समोर आले आहे. F-35 हे अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट असून ते रडारपासून लपण्यास सक्षम आहे, तरीदेखील ते इराणच्या हल्ल्याचे लक्ष्य बनले. त्यामुळे अशा प्रगत विमानाला नुकसान होणे ही मोठी बाब मानली जात आहे. त्यामुळे आता अमेरिका काय रणनिती अवलंबणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed