गौरव याला गेले काही दिवसांपासून ऑनलाईन गेम खेळण्याचा सवय लागली होती. यामध्ये तो पन्नास हजार रुपये हरले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. हरलेले पैसे भरण्यासाठी गौरवच्या मामाने गौरवला चाळीस हजार रुपये दिले. मात्र तरीही तो ताणतणावात होता.
दरम्यान शुक्रवार दि. ५ मे रोजी सकाळी गौरवने घरी वडिलांसोबत जेवण केलं. आई वडिलांना बीड येथे जाण्यासाठी पाठवले. दुपारच्या सुमारास गौरव हा हर्सूल तलाव परिसरात आला. काही वेळ तो तलावाच्या काठावर बसलेला होता. काही वेळातच त्याने तलावात उडी घेतली.
पिकाचे पैसे आले की मुलीच लग्न करु अशी त्या बापाची इच्छा; पण उद्धवस्त झालेलं सोयाबीन पाहून शेतकऱ्याची आत्महत्या
काही वेळाने ही बाब सुरक्षारक्षक राजेश गवळे यांच्या लक्षात येताच घटनेची माहिती हर्सूल पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सा. फौ. एस. आर. वाघ करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच नातवेईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्याची आई वडील बहीण यांनी टाहो फोडला. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.