गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तिकीटं संपतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बुकिंगला असाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा १६ मे पासून तिकीट बुकिंगला सुरुवात होईल.
कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
मंगळवार १६ मे रोजी १३ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण होईल
– बुधवार १७ मे – १४ सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे आरक्षण
-गुरुवार १८ मे १५ सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे आरक्षण
-शुक्रवार १९ मे १६ सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे आरक्षण
-शनिवार २० मे – १७ सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे आरक्षण
-रविवार २१ मे – १८ सप्टेंबर (हरितालिका)
• सोमवार २२ मे – १९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
– मंगळवार २३ मे – २० सप्टेंबर (ऋषी पंचमी)
– बुधवार २४ मे – २१ सप्टेंबर (गौरी आगमन)
– गुरुवार २५ मे – २२ सप्टेंबर (गौरी पूजन)
-शुक्रवार २६ मे – २३ सप्टेंबर (गौरी विसर्जन)
मध्य रेल्वे चालवणार २६ समर स्पेशल ट्रेन
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकण आणि मध्य रेल्वेने संयुक्तपणे २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या सर्व गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबतील. www.irctc.co.in या संकेतस्थळावर आजपासून विशेष शुल्कासह या गाड्यांचे तिकीट बुकिंग सुरु झाले आहे.