• Sat. Sep 21st, 2024

स्वतःला मुलगी नाही, कोते दांपत्याने आत्तापर्यंत केले २१०० मुलींचे कन्यादान, १ रुपयात विवाह

स्वतःला मुलगी नाही, कोते दांपत्याने आत्तापर्यंत केले २१०० मुलींचे कन्यादान, १ रुपयात विवाह

शिर्डी : ‘सबका मालिक एक’, ‘श्रद्धा-सबुरी’ आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ४० हिंदू आणि २१ बौद्ध अशी ६१ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे २३ वे वर्ष असून आजतागायत कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने २१०० मुलींचे कन्यादान केले आहे. विशेष म्हणजे कोते दाम्पत्याने स्वतःला मुलगी नसताना २१०० मुलींचे कन्यादान केले. महागाईच्या काळात फक्त एक रुपयात विवाह होत असल्याने यावर्षी विदर्भातील ४० तर एकूण ६१ जोडपी विवाह बंधनात अडकली.शिर्डीतील कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याला मुलगी नसल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा निश्चय केला आहेय. गेल्या २३ वर्षांपासून कोते यांच्याकडून शिर्डीत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. अवघा एक रुपया शुल्क भरून या विवाह सोहळ्यात नोंदणी करता येते. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते. यावर्षी ६१ जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

SC Verdict on Divorce: घटस्फोटासाठी ६ महिने वाट पाहण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कोते दाम्पत्याने गेल्या २३ वर्षांपासून सुरू केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात शिर्डीचे आमदार तथा राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागोतोत्सुक म्हणून जबाबदारी पार पाडतात. कोते दाम्पत्याने सुरू केलेला हा उपक्रम सामाजिक चळवळ बनली असून सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

ज्यांचा विवाह याठिकाणी पार पडला त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू – वरही समाधानी होते. तर कोते दाम्पत्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आशीर्वादाने संसासारची सुरुवात होत असल्याने वधू – वरांना आनंद झाल्याचे दिसून आले.

नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरणप्रेंमींचा विरोध, मनसे नेते वसंत मोरे झाले मोर, लूक आणि पोस्ट चर्चेत
स्वतःला मुलगी नसताना आजतागायत राज्यातील २१०० मुलींचे कन्यादान करण्याचे सौभाग्य कोते यांना लाभले आहे. या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात.. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरलाय एवढं मात्र नक्की.

दुर्दैवी! उष्णतेने वैताग आल्याने ते रात्री हवेशीर छतावर झोपायला गेले, मात्र ती ठरली शेवटची रात्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed