• Mon. Nov 25th, 2024
    Thane Accident : घोडबंदर रोडवर रिक्षा दुभाजकाला धडकून पेटली, महिला प्रवाशाचा होरपळून अंत

    कल्पेश गोरडे, ठाणे : अपघातानंतर रिक्षाने पेट घेतल्यामुळे प्रवासी महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ठाण्यातील घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रिक्षा चालकाला यामध्ये गंभीर दुखापत झाली असून महिला रिक्षातच अडकल्याने तिचा जिवंत कोळसा झाला.ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात संबंधित महिला रिक्षाने प्रवास करत होती. यावेळी रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधल्या बाजूस असलेल्या रोड डिव्हायडरवर रिक्षा आदळली. अपघातानंतर रिक्षाला आग लागली. यामध्ये रिक्षा चालकाला मोठी दुखापत झाली. तर महिला प्रवासी ही रिक्षातच अडकल्याने तिला जागीच प्राण गमवावे लागले. भाईंदरच्या दिशेने जात असताना वाटेतच महिलेवर काळाने घाला घातला.

    हॉर्न का वाजवला? कारसमोर बियरची बाटली फोडली, पुण्यात ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण
    बुधवार ३ मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोड येथील गायमुख पोलीस चौकीजवळ रिक्षाचा अपघात होऊन एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश कुमार यादव असे ४५ वर्षीय रिक्षा चालकाचे नाव आहे. गायमुख मार्गे घोडबंदरला जात असताना रिक्षावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

    बुलढाण्यात अज्ञातांनी क्षणार्धात पेटवली सनरूफ कार, सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला थरार!

    रिक्षेचा ताबा सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या मधल्या दुभाजकाला आदळली. या अपघातात रिक्षेने अचानक पेट घेतला. सदर रिक्षा चालकास गंभीर दुखापत झाल्याने उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी त्याला जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. तर महिला प्रवासी या अपघातग्रस्त वाहनामध्ये अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

    कचरा जाळण्याच्या खड्ड्यात पडून कामगार होरपळला, बारा तासांनी सापडले फक्त काही अवयव
    या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गायमुख पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, १०८ – रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे जवान ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. सदर अपघातग्रस्त वाहनामधील महिला प्रवाशाचा मृतदेह गायमुख पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देऊन १०८ रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे नेण्यात आला आहे. घटनास्थळी रिक्षेला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी ०६:०५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *