• Sat. Sep 21st, 2024

Sharad Pawar Resigns : पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच पवारांचा दे धक्का, फक्त तिघांना माहिती होता निर्णय, कोण आहेत ते?

Sharad Pawar Resigns : पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच पवारांचा दे धक्का, फक्त तिघांना माहिती होता निर्णय, कोण आहेत ते?

मुंबई : महाराष्ट्रा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली गेली. अजित पवार हे भाजपकडे वळत असल्याचा कयास लावला गेला. अशा तापलेल्या वातावरणात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करत मोठा ‘राजकीय बॉम्ब’ फोडला आहे. शरद पवार यांच्या राजकीय बॉम्बस्फोटाने अनेकांना हादरे बसले आहे. या खळबळजनक निर्णयाने पक्षातील अनेक नेत्यांना मोठा धक्का बसला.यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात आज असं काही घडेल, याचा विचारही राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या मनात आला नसेल. हेच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांच्या, आमदारांच्या भावानांमधून समोर आलं. कारण शरद पवार यांचा हा निर्णय कुणालाच माहिती नव्हता.

काय म्हणाले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते?

शरद पवार यांनी कुठलीही सूचना न देत आणि विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वांना धक्का देणार आणि स्तब्ध करणारा आहे. हा निर्णय अस्वीकार्य आहे, अशा सर्वांच्या भावना आहेत. यामुळे शरद पवार यांनी निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांनी केली.

सर्वाधिक धक्का बसलेला दिसला तो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना. जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. पाटील यावेळी भावुक झाले दिसले. जितेंद्र आव्हाडांनाही अश्रू अनावर झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या कित्येक कार्यकर्त्यांना नेत्यांना अश्रू अनावर झाले. पवारांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसलेला दिसला.

साहेब असं करू नका, कुणाच्या याचना, कुणाच्या विनंत्या, कुणी पाया पडलं.. चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं?
शरद पवार यांच्या निर्णयाने धक्का बसल्याने संपूर्ण यशवंतराव चव्हाण सेंटर स्तब्ध झालं होतं. कार्यकर्ते गोंधळले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या. घोषणाबाजी सुरू होती. पण यावेळी शांत होते ते फक्त शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई, सुप्रिया सुळे आणि अजित पवार. यावेळी अजित पवार सर्वांना शांत करताना दिसले.

कार्यकर्ते म्हणाले, दादा तुम्ही तरी साहेबांना समजावा… अजित पवार म्हणाले, फक्त एका कारणामुळे मी शांत
शरद पवारांसमोरच अजित पवार बोलले…

सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या आणि पाहिले. जीवाभावाची साथ देणाऱ्या सगळ्याचं साहेबांनी ऐकलं. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पवार साहेब अध्यक्ष नाही, म्हणजे पक्षात नाही, असं नाहीए. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहेत खर्गे, पण काँग्रेस चाललीय सोनिया गांधींकडे बघून. यामुळे पवार साहेबांच्या आताच्या वयाच्या विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनासाठी पक्षाचं काम करेल. शेवटी साहेब म्हणजे पक्ष आहे. साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचा जो कोणी अध्यक्ष होईल, तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल, दुसरं कुठलंही काम करणार नाही. साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्याक समाजाच्या पाठिशी राहतील, असं समजू नका. अध्यक्ष नसतील तर ते पाठिशी राहणार नाही, हे साहेबांच्या रक्तात नाही. साहेब अध्यक्ष असो किंवा नसू हा संपूर्ण परिवार असा पुढे चालत राहणार आहे. भावनिक होऊ नका. पवार साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवायची असते. आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मी आता काकींशी बोललो. ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत. ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ही साहेबांची भूमिका आहे, असं त्या म्हणाला. यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका. साहेब आहेतच, तुम्हाला मला दुसरा कुठला पर्याय आहे. याकरता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी अध्यक्ष होणाऱ्याला आपण साथ देऊ. आपण त्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू. अध्यक्ष नवीन गोष्टी शिकत जाईल. वेगवेगळ्या राज्यात जाणं तिथे बैठका घेणं. वय झालेले ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन करत असतात. तशाच पद्धतीने सगळं होईल. त्यामुळे तुम्ही कशाची काळजी करताय. कुणीही अध्यक्ष झालं आणि प्रदेशाध्यक्ष झालं तरी साहेबांच्या जिवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. आपण परिवारातच आहोत आणि परिवारातच राहणार आहे. पवार साहेब परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागलात. साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? मला काही कळत नाही तुमचं. नवीन अध्यक्षाला साहेब बारकावे सांगतील. साहेबांनी हाक दिल्यावर येणारच आहोत. साहेब महाराष्ट्र, देशात फिरणारच आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पवार साहेबांचं मार्गदर्शन होणारच आहे. नवीन होणारे अध्यक्ष आणि सहकारी साहेबांशी चर्चा करूनच पुढचे निर्णय घेणार आहेत. आपण एकटे आहोत. आता काही खरं नाही. यामुळे भावनिक होण्याचं काही कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. ते कालच १ मे ला निर्णय जाहीर करणार होते. पण १ मेला महाविकास आघाडीची वज्रमूठची सभा होती. यामुळे मीडियात सगळं तेच चाललं असतं. त्यामुळे २ तारीख ठरली. आणि त्यापद्धतीने साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. साहेबांच्या मनात आहेत, त्याच गोष्टी आपण सर्वजण करू अशी सर्वांना विनंती आहे, असं म्हणत अजितदाद म्हणाले.

अजितदादांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वेगळा सूर आळवला. यामुळे साहेबांना निर्णय अजित पवार यांना माहिती होता, असं बोललं जातंय. अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनाही हा निर्णय माहिती असल्याचं दिसतंय. कारण सुप्रिया सुळे यावेळी काहीही बोललेल्या नाहीत. त्या कार्यकर्त्यांना शांत करत होत्या. हा शरद पवार यांचा हा निर्णय शरद पवारांशिवाय प्रतिभाताई, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या तिघांनाच माहिती होता, असं सांगण्यात येत आहेत. कारण शरद पवारांच्या निर्णयाने पक्षातील सर्वांना धक्का बसला. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे शांत समजवताना दिसून आले. म्हणजेच पवार कुटुंबात हा निर्णय झाला होता, असं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed