साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या स्वत:च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. “साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झाले आहोत. आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा”, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेणुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.
तर, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की,”साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.