कल्याण : कल्याण पूर्वेकडे असलेल्या मलंगगड रोडला जुन्या वादातून रक्तरंजित राडा झाल्याने शनिवार-रविवारच्या मध्यरात्रीनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. या भागातील नांदीवली परिसरात फिल्मी स्टाईलने पाठलाग करत सशस्त्र चौकडीने भर रस्त्यात तलवारीने वार करत दोन तरूणांना जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अक्षय कवडे व अविनाश झा हे दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.या संदर्भात अक्षय शहाजी कवडे (२४, रा. कावेरी अपार्टमेंट, आडिवली-ढोकळी कल्याण) या जखमी कॉन्ट्रॅक्ट सुपरवायझरच्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात अक्षय कवडे व अविनाश झा हे दोघे राहतात. दोन वर्षांपूर्वी मनिष चौहाण याच्या ओळखीच्या इसमासोबत काहीतरी कारणावरून भांडण सुरू होते. त्यावेळी झालेल्या त्यांच्या भांडण वजा हाणामारीदरम्यान अक्षय कवडे याला दगड लागला. त्यामुळे अक्षय याचेही मनीष चव्हाण व राकेश हाजरा यांच्याही भांडण झाले होते.
तेव्हापासून मनिष व त्याचा मित्र राकेश यांच्या मनात अक्षय विषयी राग होता. हा राग खदखदत असतानाच रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा राग उफाळून आला. अक्षय कवडे व त्याचा मित्र अविनाश झा हे रिक्षातून मलंग रोडने घराच्या दिशेने जात होते. याच दरम्यान नांदीवली परिसरातील मेडिकलजवळ उतरून हे दोघे त्यांच्या एका मित्राशी बोलत थांबले होते. इतक्यात राकेश हाजरा व त्याचा मित्र खंजीर उर्फ कुलदीप हे दोघे दुचाकीवर आले. त्यांच्या दुचाकीवर सफेद रंगाची गोणी होती. अक्षयला पाहताच खंजीर उर्फ कुलदीपने गोणी जमिनीवर फेकली. या गोणीतून काढलेल्या तलवारीने अविनाशवर हल्ला केला. त्याचवेळी मुकेश हाजरा यानेही दुसऱ्या तलवारीने अक्षयवर वार केला. तर मुकेशचा साथीदार मनिष चौहाण याने अविनाश व अक्षयवर दगडफेक केली.

या हल्ल्यात अविनाश व अक्षय हे दोघे जखमी होऊन कोसळले. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हा सारा प्रकार पाहून परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काहींनी पुढाकार घेऊन जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हा संपूर्ण फिल्मी स्टाईल थरार तेथील एका दुकानाला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी जखमी अक्षय कवडे याच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी फरार हल्लेखोर खंजीर उर्फ कुलदीप, राकेश हाजरा, त्याचा भाऊ मुकेश हाजरा आणि मनिष चौहाण या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.