• Mon. Nov 25th, 2024

    ऊर्जा विभागाला मराठीचे वावडे; तिन्ही संकेतस्थळांत मराठी पर्याय, मराठीत भाषांतर अर्धवट

    ऊर्जा विभागाला मराठीचे वावडे; तिन्ही संकेतस्थळांत मराठी पर्याय, मराठीत भाषांतर अर्धवट

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांचा थेट संबंध हा सर्वांत आधी सर्वसामान्य मराठी नागरिकांशी येतो. तसे असतानाही या विभागाशी संबंधित कंपन्यांची संकेतस्थळे इंग्रजीतच आहेत. यांवरील मराठी भाषांवर अर्धवट स्वरूपात आहे. १ मे या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.राज्याच्या ऊर्जा विभागाच्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती, या तिन्ही कंपन्यांचे संकेतस्थळ सर्वांत आधी इंग्रजीतच सुरू होते. महावितरण व महापारेषण, या कंपन्यांच्या संकेतस्थळात ‘मराठी’ पर्याय आहे. मात्र वीजनिर्मिती व्यवसायात असलेल्या महानिर्मिती कंपनीचे संकेतस्थळ, तर पूर्णपणे इंग्रजीत आहे. महापारेषणचे संकेतस्थळ पूर्णपणे मराठीत उपलब्ध आहे, परंतु महावितरणचे संकेतस्थळ अर्धवट मराठी स्वरूपात आहे.

    महावितरणच्या संकेतस्थळाला इंग्रजी व मराठी, असे दोन्ही पर्याय आहेत. ते निवडता येतात. परंतु मराठीतील संकेतस्थळ अर्धवट स्वरूपात आहे. त्यावरील काही कळ मराठीत आहेत. परंतु त्या उघडल्यानंतर आतील माहिती पुन्हा इंग्रजीतच आहे. याचप्रमाणे कंपनीची माहिती, ग्राहकनोंदणीची माहिती, सेवेच्या विनंतीचा अर्ज, देयकांची माहिती आदी सारे काही इंग्रजीत आहे. महावितरणचा सर्वसामान्य वीजग्राहकांशी थेट संबंध येतो. कंपनीचे ग्राहक ग्रामीण भागातदेखील आहेत. हे ध्यानात घेता संकेतस्थळ मराठीत पूर्ण रूपात असणे आवश्यक आहे.

    ‘एमएमआरडीए’चे मराठीही अर्धवट

    महामुंबई क्षेत्राचा विकास करणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) संकेतस्थळावरील मराठीदेखील अर्धवट आहे. हे संकेतस्थळ सुरुवातीला मराठीत उघडते. त्यावर दोन्ही भाषा आहेत. मात्र प्रामुख्याने निविदा, विविध अहवाल हे मराठी भाषेचा पर्याय निवडल्यानंतरही इंग्रजीतच दिसतात.

    आधी इंग्रजीत सुनावलं, महावितरणही हादरलं, आज वीज कनेक्शन मिळालं, इंग्रजीतूनच अभिनंदन केलं!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *