नवी दिल्ली : सन २०२०मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षामध्ये हुतात्मा झालेले नाईक दीपक सिंह यांची पत्नी रेखा सिंह यांचा भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून समावेश करण्यात आले आहे. त्यांना पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ फॉरवर्ड बेसवर तैनात करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. लेफ्टनंट सिंग यांनी चेन्नईमधील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये त्यांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.रेखा सिंह यांचे पती नाईक दीपक सिंह हे २१व्या वर्षी २०१२मध्ये लष्करात दाखल झाले. आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये ते तैनात होते. नंतर त्यांना बिहार रेजेमेंटच्या १६व्या बटालियनशी संलग्न करण्यात आले. २०२०साली गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत नाईक दीपक यांना वीरमरण आले. नायक दीपक सिंह यांना २६ जानेवारी २०२१साली असामान्य धैर्य, कर्तव्याची निष्ठा आणि सर्वौच्च बलिदानासाठी वीर चक्रा हा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतासाठी ऐतिहासिक क्षण! तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश
दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा सिंग यांनी त्यांच्या पतीचा वारसा पुढे नेत लष्करात सामील होण्याचा धाडसी निर्णय घेताला. २०२०मध्ये लेफ्टनंट सिंग यांनी चेन्नईमधील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये त्यांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तैनात करण्यात आले आहे.ढिगाऱ्याखालून २० तासांनी जिवंत बाहेर काढलं, रडत रडत हात जोडले अन् जवानांनी धीर दिला