अहमदनगर : संगमनेरमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जसे लक्ष घातले होते, तसेच लक्ष पारनेरमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना घातले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली होती. हा धोका ओळखून राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्याशी जुळवून घेतले. दोघांची आघाडी झाली आणि एकत्रित निवडणूक लढविली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच्या सर्व १८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या मंडळाला येथे प्रवेश करता आला नाही.महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेल आणि भाजपच्या जनसेवा पॅनलमध्ये सरळ लढत झाली. १८ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रशांत संभाजीराव गायकवाड यांना सर्वाधिक ८१४ मते मिळाली. मतदारांनी आमदार नीलेश लंके यांच्या महाविकास आघाडीला कौल दिल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार लंके, माजी आमदार औटी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी केले. तर भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे नेतृत्व खासदार विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, वसंतराव चेडे, माजी सभापती बाबाजी तांबे, गणेश शेळके, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केले.
पुतण्याने काकांच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला; बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाडविजयी उमेदवार पुढील प्रमाणे :सोसायटी मतदारसंघ- प्रशांत सबाजीराव गायकवाड (८१४), अशोकराव साहेबराव सावंत (६९४), आबासाहेब भाऊसाहेब खोडदे (७५७), बाबासाहेब भिमाजी तरटे (७३८), संदीप लक्ष्मण सालके (७३३), रामदास हनुमंत भोसले (७३८), किसन पंढरीनाथ सुपेकर (६७९).
महिला राखीव- पद्मजा श्रीकांत पठारे (९२३), मेघा श्रीरंग रोकडे (७८४).
इतर मागास प्रवर्ग- गंगाराम तुकाराम बेलकर (८२९), बाबासाहेब वामनराव नर्हे (७८९).
ग्रामपंचायत मतदारसंघ- विजय विनायक पवार (५९६), किसनराव सभाजी रासकर (६०५), भाऊसाहेब सखाराम शिर्के (५०७).
अनुसूचित जाती व जमाती- शंकर ताराचंद नगरे (५९२).
व्यापारी मतदारसंघ- अशोकलाल माधवलाल कटारिया (३३८), चंदन रमेश बळगट (३८९).
हमाल मापाडी- तुकाराम दत्तू चव्हाण (६५),नवनाथ सबाजी बुगे (३५).
राणा दाम्पत्याला अमरावतीत धक्का, यशोमती ठाकूर यांच्याकडून १८-० असा क्लीन स्वीप, रवी राणांच्या भावाचा पराभव
अलीकडच्या काळात आमदार लंके आणि खासदार विखे पाटील यांच्यातील राजकारण अधिक टोकदार झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून लंके यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे दोघांकडूनही विविध निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले जाते. प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे. तशीच बाजार समितीची निवडणूकही प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या प्रचाराच्या निमित्ताने एकमेकांवर टीकाही झाली होती. राज्याच्या राजकारणातील विषयांवरही प्रचारात चर्चा झाली होती. आव्हान-प्रतिआव्हान देण्यात आले होते. लंके यांच्यासोबत औटी आल्याने आणखी रंगत वाढली होती. आता या दोघांनी पुढील निवडणुकांतही एकत्र राहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विखे यांच्या पुढील अडचणी वाढणार आहेत.
एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या पॅनलचा विजय