• Mon. Nov 25th, 2024

    हुंड्याचा वाद विकोपाला; तरुणाला मलमूत्र पिण्याची जबरदस्ती, पुण्यातील किळसवाणा प्रकार

    हुंड्याचा वाद विकोपाला; तरुणाला मलमूत्र पिण्याची जबरदस्ती, पुण्यातील किळसवाणा प्रकार

    इंदापूर : लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिंबू-हळद लावून शिव्या शाप देत आरोपीने तरुणाला भयंकर कृत्य करण्यास भाग पाडलं. तरुणाला मानवी विष्ठा खाण्यास आणि लघवी पिण्यास भाग पाडल्याचा अघोरी प्रकार इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडला. याप्रकरणी ११ जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४ महिलांचाही समावेश आहे.

    नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

    याबाबत अनिकेत विजय भोसले (रा. साठेफाटा, फलटण जि. सातारा, सध्या रा. बेंबळे ता. माढा जि. सोलापूर) या युवकाने इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचे तीन वर्षांपूर्वी आरोपीच्या मुलीशी जमलेलं लग्न हुंड्यामुळे मोडलं होतं. दरम्यान, या प्रकरणात वाद विकोपाला गेल्यानंतर ५ लाख पैशांची मागणी करत आरोपींनी फिर्यादी तरुणाला मारहाण केली.

    आता हेच बघायचं राहिलं होतं; बावऱ्या बैलासमोर नाचली गौतमी; Video व्हायरल
    देवाच्या नावाने आरडा ओरडा करत फिर्यादीला लिंबू-हळद लावून शिव्या शाप दिले जात होते. तरुणाला जबरदस्तीने नवरी मुलीसह लज्जास्पद कृत्य करायाला लावलं. त्याशिवाय मानवी विष्ठा आणि लघवी पिण्यासारखं कृत्य करण्याची जबरदस्ती केल्याची तक्रार फिर्यादीकडून करण्यात आली आहे. आरोपींपैकी एका आरोपी महिलेने या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो आपल्या फेसबुकवर शेअर केल्याचंही ही फिर्यादीने म्हटलं आहे. त्यामुळे आरोपींवर आयटी ॲक्टचे ७६ अ कलम देखील लावण्यात आलं आहे.

    जलतरण तलावाचा ‘खेळ’; अधिक शुल्कवसुलीसह जिवालाही धोका, पालिकेच्या नांदे तलावावरील प्रकार
    आरोपींमध्ये स्वप्नाली कासलिंग शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे आणि मंदा काळे या ४ महिलांसह दिनेश शिंदे, बापूराव शिंदे, कासलिंग बापूराव शिंदे, अजय पवार, लखन काळे, दिनेश शिंदे यांचा मुलगा (सर्व रा. काटी, ता. इंदापूर) आणि अतुल काळे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशा ७ पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *