या स्पर्धेमध्ये दक्षिण आशियाई देश भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि मालदीव भाग घेणार आहेत. ही स्पर्धा बांगलादेशातील ढाका येथील शेख जमाल नॅशनल टेनिस कॉम्प्लेक्स येथे १६ मे ते २० मे दरम्यान होणार आहे.
या संपूर्ण यशाचे श्रेय ॠषिकेश आपल्या आईसह, वडील आणि प्रशिक्षक यांना देत आहे. तर आपल्याला या निवडीवर आनंद आहेच, मात्र यात माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका ब्लेसी मॅडम यांनीही आपल्याला संपूर्ण मोकळीक दिली असल्याने खेळावर लक्ष केंद्रित करण्यात वेळ मिळत आहे. त्यामुळे आपण सर्वांचे आभार मानत असून, होणाऱ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या टीमला हरवून पुढे जाण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. आपण देशाचे नाव मोठे करण्याचेही स्वप्न बाळगले असून क्रिकेट व्यतिरिक्त टेनिसमध्येही भविष्य घडवले जाते, अशी भावना यावेळी ऋषिकेश माने याने व्यक्त केली.
इतक्या लहान वयात ऋषीकेशने मिळवलेल्या यशाचे कौतुक ऋषिकेशचे वडील प्रवीण माने आणि प्रशिक्षक गीतेश अवस्थी यांनी केले असून ऋषीकेशने देशाचे नाव मोठे करावे अशी प्रतिक्रिया यावेंळी ऋषिकेशचे वडील प्रवीण माने आणि प्रशिक्षक गीतेश अवस्थी यांनी दिली आहे.