मुंबई- पुणे महामार्गावर खोपोलीजवळ विचित्र अपघात; ७ ते ८ वाहनांची एकमेकांना धडक, अनेकजण जखमी
ठाणे – बोरिवरी या डायरेक्ट लिंकची एकूण लांबी ११.८ किमी असणार आहे. या मार्गावर ३ + ३ अशा लेन असतील. अंडर ग्राउंड टनलची लांबी १०.८ किमी असणार आहे. ठाणे – बोरिवली अशा मार्गावर घोडबंदरवरुन जाताना सध्या जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र या ठाणे – बोरिवली डायरेक्ट लिंकमुळे हा कालावधी दोन तासांवरुन थेट १५ मिनिटांवर येणार आहे. ठाणे – बोरिवली या भुयारी रोडसाठी जवळपास ८९०० कोटींचा खर्च येणार आहे.
सध्या बोरिवली – ठाणे प्रवासासाठी घोडबंदरवरुन जाण्याचा मार्ग आहे. हा रोड मीरा रोड ते ठाण्याचा पूर्व द्रुतगती महामार्ग असा आहे. हा मार्ग अतिशय लांब असून या मार्गावरुन जाताना टोलही लागतो. घोडबंदर रोडवर मोठी वाहतूककोंडी असते. मात्र ठाणे – बोरिवली हा टनल रोड सुरू झाल्यास घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी करण्यास मदत होईल.
पश्चिम उपनगर बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी नी वाडी येथील मार्गावरुन हा टनल रोड जोडला जाईल. या टनल रोडमुळे ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार असून वाहतूककोडींही कमी होण्यास मदत होणार आहे.