• Mon. Nov 25th, 2024
    राज ठाकरेंचा अजितदादांना सूचक सल्ला, म्हणाले, ‘काकांकडे पण लक्ष द्या’

    मुंबई:गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरु असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट फोडून भाजपसोबत जातील, अशी जोरदार चर्चा मध्यंतरी होती. परंतु, अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही अजित पवार यांच्याबाबतची कुजबूज काही केल्या थांबायला तयार नाही. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजूनही वचक आहे. त्यामुळेच अजित पवारांचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन फसला, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवार यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

    देवेंद्र फडणवीस कोणासोबत आहेत हे तरी कुठे कळतंय? राज ठाकरेंनी अमृता फडणवीसांचा प्रश्न त्यांच्यावरच उलटवला

    मुंबईत बुधवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये विशेषत: अमृता फडणवीस यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत दिलेली उत्तरं चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये काही प्रश्न विचारले. तुम्ही अमुक नेत्याला काय सल्ला द्याल, असे अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना एक-एक करुन विचारले. यामध्ये अजित पवार यांचे नाव येताच राज ठाकरे यांनी एक मोठा पॉझ घेतला. पुढे ते म्हणाले की, मला रत्नागिरीतील ५ तारखेच्या सभेत यावर सविस्तर बोलायचं आहे. मला या सगळ्यावर एका वाक्यात बोलायचे नाही. पण अजित पवारांना मी इतकं सांगेन की, ‘तुम्ही बाहेर जेवढं लक्ष देताय, तेवढंच काकांकडे पण लक्ष द्या’. राज ठाकरे यांनी अजितदादांनी दिलेल्या या सूचक सल्ल्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.

    देवेंद्रजींची पत्नी नाही तर… राज ठाकरेंची मुलाखत घेण्याआधी अमृता फडणवीसांचा डिस्क्लेमर

    या रॅपिड फायर राऊंडमध्ये राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर राज यांनी एकनाथ शिंदे यांना जपून राहण्याचा सल्ला दिला. तर देवेंद्र फडणवीस यांना, ‘वर संबंध नीट ठेवा’, असा सल्ला दिला. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा विषय येताच, ‘ते स्वयंभू आहेत, त्यांना मी काय सांगणार’, इतकी मोघम प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

    एखाद्याच्या मागे किती हात धुवून लागायचं?; मी शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार | अजित पवार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed