• Mon. Nov 11th, 2024

    बसमधून प्रवास करताना सावधान! गर्दीत चोरांची हातसफाई, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    बसमधून प्रवास करताना सावधान! गर्दीत चोरांची हातसफाई, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई:मुंबईतील बेस्टच्या बस होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. युनिट १२च्या पथकाने गोरेगाव परिसरातून इम्रान खान, महेंद्र झांझरे, मोह्हमद खान, शकील अन्सारी आणि आसिफ शेख यांना अटक केली. या चौघांकडून आतापर्यंत सुमारे साडेसात लाखांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे चोरलेले मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.उत्तर मुंबईमध्ये विशेषतः गोरेगाव ते दहिसर या बेस्ट बसमधील प्रवासामध्ये गर्दीत प्रवाशांचे मोबाइल, मौल्यवान वस्तू, पाकीट चोरीला जाण्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होता. वाढत्या घटना लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट १२च्या पथकाने असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवली. चोरांच्या हालचाली टिपत असतानाच युनिट १२चे कॉन्स्टेबल सोनावणे यांना एका टोळीबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी निरीक्षक विलास भोसले याच्या पथकातील निरीक्षक दिलीप तेजनकर, सहायक निरीक्षक रासकर, सोनावणे, बने, बिटकर,राणे, सावंत, जाधव याच्या पथकाने गुरुवारी मालाड पूर्व परिसरात सापळा रचला. यावेळी इम्रान, महेंद्र आणि मोहम्मद हे तिघे प्रवाशाचे खिसे चाचपडत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच ते शकीलच्या रिक्षातून हे तिघे पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांसह रिक्षाचालकालाही अटक केली.

    पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाइल सापडले. त्यानंतर पोलिसांनी इम्रान, महेंद्र आणि मोहम्मद यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरीचे मोबाइल आसिफ शेख याला विकत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यात अँड्रॉइड तसेच अँपल कंपनीचे मिळून ६८ मोबाइल या टोळीकडून हस्तगत केले.

    तुरुंगातील ओळखीतून झाले साथीदार

    इम्रान हा चोरांच्या टोळीचा सूत्रधार असून त्याची महेंद्र, मोहम्मद आणि शकीलसोबत तुरुंगात ओळख झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर या सर्वांनी मिळून टोळी बनविली आणि बसमध्ये खिसे कापण्यास सुरुवात केली. दिवसाला पाच ते दहा मोबाइल चोरीचे लक्ष्य ठेवूनच ते बसमध्ये शिरत. शकील हा बस थांब्याच्या पुढे रिक्षा घेऊन थांबत असे. मोबाइल खिसकावल्यावर कुणाच्या लक्षात आल्यास रिक्षातून हे चोर पळ काढत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed