• Sat. Sep 21st, 2024
देवेंद्रजींची पत्नी नाही तर… राज ठाकरेंची मुलाखत घेण्याआधी अमृता फडणवीसांचा डिस्क्लेमर

मुंबई :मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीला सुरुवात करतानाच मिसेस फडणवीसांनी भाजपचं प्रतिनिधित्व करत नसल्याचा तसेच देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून बोलत नसल्याचा डिस्क्लेमर दिला. तर उत्तर देताना अमृता फडणवीसांच्या या इशाऱ्यावरुन राज ठाकरेंनीही चांगलीच राजकीय टोलेबाजी केली.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“सर्वांना माझा नमस्कार. एक डिस्क्लेमर सर्वात आधी मला द्यावा लागेल, ही मुलाखत मी एक मुलाखतकार किंवा व्यक्ती म्हणून घेत आहे. मी भाजपचं प्रतिनिधित्व करत नाहीये, किंवा देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून बोलत नाहीये. सर्वांनी हे नोट करावं, प्रॉब्लेम्स नको व्हायला म्हणून सांगते” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मुलाखतीला सुरुवात केली.

“राज ठाकरे…. नावातच राज आहे, तुम्हाला पाहताच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिबिंब समोर येतं. तसंच व्यक्तिमत्त्व, तोच बाणेदारपणाचा लूक, जो तुम्ही देताय, तोच करिष्मा, तोच दबदबा, बोलण्याची तीच लय, बाळासाहेबांचे तुम्ही लहानपणापासून फेवरेट, ते प्रेमाने तुम्हाला टिनू म्हणायचे.. शिवसेनेची धुरा आज तुमच्या हाती असती, तर आज ही अवस्था झाली नसती… राज्य हातात असताना शिवसैनिक पळून जाणं, एवढे नेते दुरावणं कधी झालं नसतं, शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड झाली नसती” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

सभा सुरु असताना उद्धव ठाकरेंचा फोन, संजय वातावरण कसंय? राऊत म्हणाले, कलम १४४ तोडलंय…!
“तुम्ही भाजपचं प्रतिनिधित्व करत नाही आहात किंवा देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून विचारत नाही, असं म्हणालात, परंतु तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय…” असं राज ठाकरेंनी म्हणताच “हे लोकांचे प्रश्न आहेत” असं अमृता म्हणाल्या. “मेरे साथ भाई बोल रहा है या इन्स्पेक्टर के भेस मे मेरा भाई बोल रहा है हा दिवारमधला डायलॉग आठवला” असं सांगतानाच राज ठाकरे यांनी तो विषय मी बंद केलाय, झालं ते झालं, असं म्हणत तो प्रश्न सोडून दिला.

देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची मैत्री, मुख्यमंत्री पदाची चर्चा; अमृता फडणवीसांचं स्पष्ट उत्तर

“राजकारणात सध्या टाळी देण्याचे किंवा डोळा मारण्याचे प्रकार सुरु आहेत, तुम्ही कोणाला टाळी देणार?” असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला. तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ असता, कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जवळ असता, कधी भाजपला टाळी देता.” असं अमृतांनी विचारलं. “तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहात, तर मी बोलूनच घेतो. आपले उपमुख्यमंत्री कोणासोबत आहेत तेच कळत नाही” असं राज ठाकरे म्हणताच हशा पिकला. “ते खूप लॉयल आहेत” असं मध्येच अमृता म्हणाल्या.”देवेंद्रजी पहाटे गाडी घेऊन कुठे जातात तुम्हालाही पत्ता नसतो. ते कधी शिंदेंसोबत असतात, कधी अजित पवारांसोबत. कारण राजकारणात कोणालाही भेटणं बोलणं ही बातमी झालेय” असं राज ठाकरे म्हणाले.

ठाकरेंच्या निष्ठावंताची राष्ट्रवादी आमदाराशी आघाडी, धूळ चारणाऱ्या राजकीय वैऱ्याशी मनोमीलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed