• Sat. Sep 21st, 2024

विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार, पत्नीचीही साथ; विद्यापीठाने उचलले मोठे पाऊल

विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार, पत्नीचीही साथ; विद्यापीठाने उचलले मोठे पाऊल

छत्रपती संभाजीनगर :उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेल्या विद्यार्थिनीवर प्राध्यापकाने पत्नीच्या मदतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक अशोक बंडगर यांच्या निलंबनाचे आदेश २६ रोजी बुधवारी तत्काळ काढले आहेत.इतर जिल्ह्यातून ३० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय कला महाविद्यालयात एमपीए करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आली. शिक्षण घेत असताना तिची ओळख नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक अशोक बंडगर यांच्याशी झाली. ही विद्यार्थिनी इतर जिल्ह्यातील असल्यामुळे तिला राहण्यासाठी होस्टेल शोधत होती. यावेळी तिची भेट प्राध्यापक झाली.

हृदयद्रावक! सर्विसिंग सेंटरमध्ये गाडी धूत होता, क्षणात असे काही घडले की होत्याचे नव्हते झाले
यावेळी प्राध्यापक म्हणाला की, हॉस्टेल मुलींसाठी चांगले नसते, तू आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहा. तुला चित्रपटात कामही देतो, असे सांगून विद्यार्थिनीला घरी येऊन गेला. सुरुवातीला तिचा विश्वास संपादित केला. तिला मुलीप्रमाणे वागणूक दिली. मात्र काही दिवसांनी शिक्षकाने विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला. धक्कादायक म्हणजे यामध्ये प्राध्यापकाची पत्नी देखील सहभागी होती.lयाप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राध्यापकाचा शोध घेतला असता तो अद्यापही फरार आहे.

जेसन रॉयची तुफानी फटकेबाजी, शाहबाज अहमदला रिमांडवरच घेतले, एकाच षटकात ठोकले ४ षटकार
गुरु शिष्याच्या नात्याला काळी माफ असणारी घटना घोडके झाल्यामुळे विद्यापीठ परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांकडून घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान या प्रकरणी प्राध्यापकाला निलंबन करण्याची मागणी देखील काही संघटनांनी केली. दरम्यान घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने यावरती तात्काळ ॲक्शन घेतली कुलगुरूंच्या आदेशाने कुलसचिव यांच्या सहीचे पत्र जारी करत प्राध्यापकाचे निलंबन करण्यात आले.

धाराशिव हादरला! शेतीच्या बांधावरून भांडण झाले, तीन तरुणांनी त्याला चौकात गाठले संपविले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed