• Tue. Nov 26th, 2024
    राज्यात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३,३३३ कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघड; बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ

    नाशिक: नाशिक शहरात आयकर विभागाने काही कर बुडव्या बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली होती. गेल्या पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू होती. मंगळवारी ही कारवाई संपली असून यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले आहेत. तर साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याबाबत एका मराठी वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.

    नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील सुमारे २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये दिवस-रात्र ही कारवाई करत होतं. जवळपास १०० खासगी वाहनातून हे पथक नाशिकमध्ये पहाटे दाखल झालं होतं. या पथकांनी नाशिकमधील बांधकाम व्यवसायिकांचे कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले. नाशिक शहरात ठिकठिकाणी छापासत्र सुरू असतानाच त्याच पथकातील काही पथकांनी इगतपुरी शहरात देखील छापा टाकला होता. तेथील एका बड्या लॉटरी व्यावसायिकाकडे जवळपास १० ते १५ अधिकाऱ्यांनी तळ ठोकून दिवसभर चौकशी केली. याच छाप्यात सुमारे ७० ते ८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे.

    मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा; अस्थिरतेचे सावट दूर करत एकनाथ शिंदेंबद्दल फडणवीस स्पष्टच बोलले!
    दरम्यान, नाशिक शहरातील निवडक बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्या कारवाईमुळे शहरातील करबुडव्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तब्बल पाच ते सहा दिवस चाललेल्या या छापेमारीत कोट्यावधी रुपयांचे घबाड आयकर विभागाच्या हाती लागले आहे.

    शहरातील काही नामांकित बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाने २० एप्रिल रोजी पहाटे वेगवेगळ्या खासगी वाहनातून शहरात दाखल होत छापे टाकले. यात नाशिकसह अन्य जिल्ह्यातील आयकर विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकत्रित येत ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे.

    शिवशाही बसला भीषण अपघात: चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली, १ जागीच ठार, २२ प्रवासी जखमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed