नवी मुंबई: मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर २५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही शिवशाही बस पनवेलकडून महाडच्या दिशेने जाणारी बस होती. दरम्यान, कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ बस ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला बस पलटी झाली. यात तब्बल २० ते २५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली तर एका व्यक्तीच्या जीवावर हा प्रवास बेतला आहे.
मृत्यू झालेला दिप्तेश टेमकर हा ३२ वर्षीय तरुण याच बसमधून प्रवास करत होता. रोहा तालुक्यातील पडम गावचा दिप्तेश आपल्या गावच्या पालखी सोहळ्यासाठी या शिवशाही बसमधून रोह्याला जात असताना कर्नाळा खिंडीत या बसचा अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला होता. बस बाहेर काढल्यानंतर तात्काळ दिप्तेशला कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

ऐन पालखी सोहळ्यात गावात उत्साहाचे वातावरण असताना दिप्तेश टेमकरच्या अकाली जाण्याने संपूर्ण पडम गाव दुःखात बुडालं आहे. दीप्तेश हा तरुण अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. विविध वाद्य वाजवण्यात तो पारंगत होता. उत्कृष्ट वादक म्हणून त्याची सर्वत्र चांगली ओळख होती. तो कामानिमित्त मुंबईला असायचा. परंतु गावातील पालखीसाठी गावाला परतत असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. दिप्तेशच्या जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार, पडम ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.