• Sat. Sep 21st, 2024

नियोजित कार्यक्रम नसताना फडणवीस विखे पाटलांच्या घरी, विखेंबद्दलच्या त्या चर्चेला पुन्हा बळ

नियोजित कार्यक्रम नसताना फडणवीस विखे पाटलांच्या घरी, विखेंबद्दलच्या त्या चर्चेला पुन्हा बळ

Fadnavis Meets Radhdkrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका भेटी पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस हे अचानक लोणी येथे विखे पाटलांच्या घरी गेले. आणि तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

 

devendra fadnavis meets vikhe patil
नियोजत कार्यक्रम नसताना फडणवीस विखे पाटलांच्या घरी, विखेंबद्दलच्या त्या चर्चेला पुन्हा बळ
अहमदनगर :महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप यायचा आहे. मात्र, तोपर्यंत अनेक राजकीय नवी समीकरणे चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाजपचे सहकारातील ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार. या चर्चेत तथ्य नसल्याचे आणि आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे स्वत: विखे पाटील यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, रविवारी अहमदनगर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियोजत कार्यक्रम नसताना लोणी येथे विखे पाटलांच्या घरी गेले. त्यांनी काही काळ विखे कुटुंबीयांसोबत घालविला. त्यामुळे जुन्या चर्चेला पुन्हा बळ आले आहे.सध्या जोडण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमध्ये विखे पाटील मुख्यमंत्री होणार, हे एक समीकरण मांडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा आहे. त्यासाठी काही कारणेही दिली जातात. विखे पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. इकडे भाजपच्या संस्कृती बऱ्यापैकी मिसळून राज्यातील आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क वाढविला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सहकारातील ते एक मोठे प्रस्थ आहे. केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आणि पहिली सहकार परिषद घेण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. मुख्य म्हणजे सध्या आश्यकता असल्याप्रमाणे त्यांचे सर्वच पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत, तर पवार कुटुंबीयांची टोकाचे वैर आहे.

अण्णा हजारे बनले उद्योजक, राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यावरील तेल आणि मसाले निर्मिती
निवडणुकीला सामोरे जाताना एक मराठा चेहरा असावा, असे भाजपला वाटत असल्याने आणि अन्य समीकरणेही जुळत असल्याने विखे पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा होती. दोन-तीन दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी स्वत:च यावर स्पष्टीकरण दिले होते. असे काहीही नसल्याचे सांगताना फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे विखे पाटील म्हणाले होते.
राम शिंदेंनी मोठा डाव टाकला,बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला उमेदवारी, कर्जतमध्ये खळबळ
विखे पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही चर्चा काहीशी कमी झाली. मात्र, रविवारी रात्री अचानक फडणवीस यांनी लोणी येथे जाऊन विखे पाटील यांचा पाहुणचार घेतला. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते नगरच्या कुस्ती स्पर्धेहून थेट शिर्डी विमानतळावर जाणार होते. मात्र, त्यांनी मध्येच लोणी येथे थांबून विखे पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवून नंतर पुढील प्रवास केला. अर्थात ही कौंटुबीक भेट होती. सर्व सदस्यांना ते भेटले. सर्वांचा फोटोही काढला. मात्र फडणवीस आणि विखे यांच्यातील संबंध यामुळे अधोरेखित झाले. या घटनेचा संदर्भ देत जुन्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे. तसे झालेच तर अहमदनगर जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचा आनंदही व्यक्त केला जाऊ लागला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed