• Sat. Sep 21st, 2024
शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या मास्तराकडूनच राक्षसी कृत्य, अल्पवयीन मुलीवर…

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या एका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेल्या एका शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या शिक्षकाच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फरार असलेल्या त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. मोहोळ तालुक्यातील एका वस्ती शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही बाब उघड होताच एका नागरिकाने महिला आयोगाकडे थेट तक्रार केली. महिला आयोगाचे पत्र पोलिसांना प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अनेक दिवसांपासून अत्याचार करत होता

मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एका शिक्षकाची वाईट नजर होती. तो तिला वाईट नजरेने पाहत होता. विद्यार्थिनीला कोणीही नसताना वर्गात बोलावून घ्यायचा. अल्पवयीन विद्यार्थिनी वर्गात आल्यानंतर तिच्या अंगाला हात लावायचा. त्याला विरोध केल्यानंतर “माझ्याकडे तुझे प्रूफ आहेत”, असं म्हणून ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यात कधी सकाळी वर्गात लवकर आल्यानंतर, तर कधी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आठवीच्या वर्गात बोलावून पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करत होता.

रिफायनरी सर्वेक्षण: मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही
पीडित मुलीला धीर देत पालकांनी फिर्याद दिली

शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची ही घटना १५ एप्रिल रोजी उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या पालकांनी विश्वासात घेऊन माहिती घेऊन तिला धीर दिला. काल रविवारी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी त्या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे करत आहेत.

महिला आयोगाने दखल घेतली

गावातील एका सुजाण नागरिकाने पत्राद्वारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महिला आयोगाने मोहोळ पोलिसांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोहोळ पोलिसांनी याबाबत गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांच्याकडे अहवाल मागितला आहे. गट शिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी यांनी शाळेत जाऊन शिक्षकांचे जबाब घेतले आहेत. शाळेतील मुख्याध्यापक वैद्यकीय रजेवर असून संबंधित शिक्षकही रजेवर गेला आहे. त्यामुळे त्यांना चार शिक्षकांचे जबाब मिळाले आहेत. याबाबतचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मोहोळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात येणार आहे.

CSKच्या मराठमोळ्या गोलंदाजाच्या प्रेमात पडला ब्रेट ली, MI च्या रोहितला बोल्ड करणारा चेंडू….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed