• Mon. Nov 25th, 2024
    मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही

    राजापूर :‘मला हॉस्पिटलला जायचं नाही, माझं काय व्हायचं ते इथे येऊन दे,’ अशा शब्दांत राजापूर तालुक्यातील शिवने येथील लीलावती घाडी या ५४ वर्षीय महिलेने चक्कर आल्यानंतरही आपली भूमिका ठामपणे व्यक्त केली. कोकणातील राजापूर तालुक्यात सध्या प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू झालं आहे. या सगळ्या विरोधात रिफायनरी प्रकल्प विरोधक व काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच एका महिलेला उष्माघाताने चक्कर आल्यानंतरही तिने हॉस्पिटल ला जाण्यास नकार दिल्याने नाही हा विषय चर्चेचा ठरला आहे.राजापूर तालुक्यातील शिवने येथील शेती करणारी ही महिला आहे. माळरानावरतीच या महिलेची शेती आहे. मात्र या प्रकल्पात या महिलेची शेती गेली आहे. तिने आपला मुक्काम सध्या शिवने येथील माळरानावरतीच कायम ठेवला आहे. तळपत्या उन्हातही या माळरानावरती सध्या शेतकरी जमले आहेत. या शेतकऱ्यांमधीलच असलेली ही एक महिला चक्कर आल्याने जागेवरच तिची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी करण्यात आली. मात्र, या महिलेने स्पष्ट शब्दात हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
    तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
    लीलावती घाडी या शिवने येथील माळरानावरतीच आपला मुक्काम ठोकून आहेत. तिथेच त्यांना सध्या विश्रांती देण्यात आली आहे.

    रिफायनरी विरोधी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    दरम्यान, बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, स्वप्नील सोगम, अमित नेवरेकर पोलिसांच्या ताब्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित भू सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडियाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा मंगेश चव्हाण या दोघांना (फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १५३ (१) प्रमाणे) ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

    फेसबुकवर झाली ओळख, तरुणाने बारावीच्या विद्यार्थिनीला लॉजवर नेत केले धक्कादायक कृत्य
    ते दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम १५१ (३) प्रमाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश केले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे

    दरम्यान, या सगळ्या विषयावर जिल्हा पोलीस प्रशासनाचे प्रमुख धनंजय कुलकर्णी हे लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात जवळपास ४५ व्यक्तींना प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांवर सायबर सेलची नजर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कठोर अशी कारवाई केली जाईल, असाही इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आला आहे.

    तरुणाने दोन बहिणींना ओढले प्रेमाच्या जाळ्यात, मिळाली अशी शिक्षा, चप्पलने बदडले, त्यानंतर सर्वांसमोर कपडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed