• Mon. Nov 25th, 2024

    चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2023
    चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये

    मुंबई, दि. २४ : चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.

    सकल चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने चर्मकार समाजाच्या प्रगती आणि विकासासाठीच्या मागण्यांसंदर्भात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गजभिये यांना निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान श्री. गजभिये यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

    चर्मकार समाजासाठी अहमदनगर, औरंगाबाद येथे संत रोहिदास भवन व अध्ययन सेंटर उभारणे, गटई कामगारांना पेन्शन योजना लागू करणे, गटई कामगारांच्या मुलांकरिता शिष्यवृत्ती मिळणे, महामंडळाच्या योजनांमध्ये अनुदानाची रक्कम २० टक्के वरून ४० टक्के इतकी करणे, चर्मकार समाजातील व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार प्रदान करणे, तरूणांना कौशल्य विकासाच्या अंतर्गत व्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे, होलार समाजास प्रतिनिधीत्व देणे, जीवनमान उंचावण्याकरिता सामूहिक लाभाच्या योजना तयार करणे, समूह उद्योग बनवून कर्ज वाटप करणे, गटई कामगारांचा सर्व्हे करून नागपूर महानगरपालिकेच्या धर्तीवर गटई स्टॉल देणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या येाजनेच्या अनुदानामध्ये वाढ करणे, आयटीआयमार्फत चर्मोद्योगाचे कोर्सेस सुरू करणे आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *