काही जणांना वाटत होतं, ते म्हणजे शिवसेना पण, काही जणांनी सभेत घुसण्याची घोषणा केली होती. निवडणुकीच्या काळात अशा घुशींना मतदानातून उचलून आपटायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
४० गद्दार, हरामखोर गेला तर फरक पडत नाही, पण जेव्हा एक विश्वासू माणूस जातो त्यावेळी खड्डा पडतो. वैशाली पाटील यांनी जुनी आठवण सांगितली. महाविकास आघाडीचं सरकारनं नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली आहे. यांच्या अवकाळी सरकारनं शेतकऱ्यानं मदत केली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्या सरकारविरोधात किंवा सत्य बोललं की सरकार लोकांना आत टाकत आहे. आपण त्यांना काही दिलं नव्हतं. आज माझ्याकडे काहीच नाही, शिवसेना नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, वडील चोरत आहेत, तरी देखील तुम्ही आला आहात. तुमचे आशीर्वाद देणारे आहेत त्यामुळं कुणामध्ये हिम्मत आहेत, त्यांनी येऊन दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्यासमोर भाजप आव्हान हे बिल्कुल नाही. भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असेल तोपर्यंत देशाचं होणारं नुकसान कसं भरुन काढायचं हे आव्हान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात शेतकरी आत्महत्येचा विषय मांडला.
सगळे गुलाबो गँग नसतात काही जण संजय राऊतांसारखे मर्द असतात. नितीन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक यांच्यामागं चौकशीचा ससेमिरा लावला आहे. आव्हानं कसली देता, आव्हान द्यायला मर्द असायला लागतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो, म्हणून ही जनता इथं आली आहे. निवडणूक कधी पण लागेल, गद्दारांना तुम्हाला गाडावं लागेल. न्यायदेवता न्याय नक्कीच देईल. राहुल गांधी यांनी अदानींवर प्रश्न विचारले तर त्यांची खासदारकी घालवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, मी माझं नाव घेऊन येतो असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. पावसाळ्यापूर्वी काय आता निवडणुका लावा. मशाल घेऊन येतो. महाराष्ट्र हा गद्दारांचा होऊ शकत नाही ती वीरांचा आहे, असंही ते म्हणाले.