• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईतील ९ युवक व ९ युवती पवना धरणावर फिरायला गले, तेथे घडली धक्कादायक घटना, सारे हादरले

    मुंबईतील ९ युवक व ९ युवती पवना धरणावर फिरायला गले,  तेथे घडली धक्कादायक घटना, सारे हादरले

    पवन येवले, लोणावळामावळ तालुक्यातील पवनाधरण परीसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा पवना धरणात पोहताना धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरातील फांगणे गावच्या हद्दीत घडली आहे.

    साहिल विजय सावंत (वय १८ वर्षे, रा. परळ, मुंबई) असे पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

    लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई परळ येथील एका कॉलनीतील (वसाहत) नऊ युवक आणि नऊ युवती असे एकूण १८ जण दुपारी पवना धरण परिसरात पर्यटन व फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण पवनाधरण पाणलोट क्षेत्रातील सांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. हा धरण परिसर खोलगट असल्याने पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या पैकी साहिल याला येथील धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

    विकृतीचा कळस; नवऱ्याचे गर्भवती पत्नीवर अत्याचार, घटस्फोट न देतात पत्नीच्या भावजयीशी केले लग्न
    साहिल बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीची मागणी केली. आरडाओरड ऐकून परीसरात असलेल्या टेंट व्यवसायिक व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष शेळके व त्यांचे सहकारी नितीन कदम, होमगार्ड भिमराव वाळुंज, श्रीकांत घरदाळे हे काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले.

    धक्कादायक! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले
    यानंतर पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. शिवदुर्गचे आपत्कालीन पथक पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेत आहे.
    कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघड; लॉजवर सुरू होते भलतेच, २ अल्पवयीन मुलींची सुटका, दलाल महिला अटकेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed