• Sat. Sep 21st, 2024

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघड; लॉजवर सुरू होते भलतेच, २ अल्पवयीन मुलींची सुटका, दलाल महिला अटकेत

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघड; लॉजवर सुरू होते भलतेच, २ अल्पवयीन मुलींची सुटका, दलाल महिला अटकेत

डोंबिवली :गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण पश्चिमेकडे असलेल्या एका लाॅजवर गुरूवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून तेथील एका खोलीतून दोन मुलींची वेश्या व्यवसायात जाण्यापूर्वीच सुटका केली. दीड लाख रुपयांच्या व्यवहारात या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास दलाल महिलांनी भाग पाडले होते. या दोन्ही महिला दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.अंजू नंदकिशोर सिसोदिया (वय ३७ वर्षे, रा.सुंदर अपार्टमेंट, कोपरखैरणे, नवी मुंबई) आणि सरीता कृृपालिनी सिसोदिया ( वय ३५ वर्षे, रा. गणेश नायक बिल्डिंग, कोपरखैरणे, नवी मुंबई) असे देहव्यापारातील दलाल महिलांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी दीड लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली आहे.

आंबा खाताय, सावधान! आंब्यावर रसायनांची फवारणी, एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अनिल पॅलेस नंबर एक लाॅजिंग अँड बोर्डिंगमध्ये दोन मुलींना दलाल महिलांकडून वेश्या व्यवसायात जबरदस्तीने लोटले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या प्रकरणाची पोलिसांनी खात्री पटल्यावर त्यांनी बनावट ग्राहक तयार केले. या महिलांना बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क करुन शरीरसंबंधासाठी दोन अल्पवयीन मुली पाहिजेत, अशी विचारणा करण्यास सांगितले. यातील दलाल महिलने या व्यवहारासाठी दीड लाख रुपयांची मागणी करून कल्याणमधील ॲनिल पॅलेस लाॅजिंगमध्ये बनावट ग्राहकाला येण्यास सांगितले.

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप, नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक
दोन दलाल महिलांच्या तावडीतून झाली सुटका

ठरल्या वेळेत ग्राहक लाॅजिंगमध्ये पोहोचून त्याने अंजू आणि सरिता यांना दीड लाखाची रक्कम दिली. तेथे दोन अल्पवयीन मुली एका खोलीत बसल्या होत्या. ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने लाॅजवर अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तेथील एका खोलीतून दोन मुलींना दलाल महिलांच्या तावडीतून ताब्यात घेतले. संरक्षणासाठी या दोन्ही मुलींना महिला व बालकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नवी मुंबईत पुन्हा छमछम, डान्सबारमध्ये पहाटेपर्यंत चालतात अश्लील नृत्ये; पोलिसांची मोठी कारवाई
या प्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील हवालदार मीनाक्षी खेडेकर यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, अनैतिक व्यापार, बाल न्याय संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed