• Mon. Nov 25th, 2024
    खरेदीसाठी गेले, घरी येताना टेम्पोची बाईकला धडक; सिल्लोडमधील सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

    म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड : सिल्लोड शहरात दोन सख्ख्या भावांचा अपघातात दुर्वैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिल्लोड शहरातील जळगांव – छत्रपती संभाजीनगर वळण रस्त्यावरील हॉटेल शालिमार समोर हा अपघात झाला. शालिमार हॉटेलसमोर मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २१ एप्रिल रोजी शुक्रवारी आठच्या सुमारास घडली. या अपघातामुळे भवन या गावावर शोककळा पसरली आहे.

    या घटनेची माहिती अशी, की शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सिल्लोड शहरातून खरेदी करून आपल्या भवन गावाकडे रितेश ज्ञानेश्वर कळम (वय १८ वर्ष) रूपेश ज्ञानेश्वर कळम (वय ९वर्ष) हे दोघे भाऊ शहरातील वळण रस्त्यावरून मोटारसायकलवरून जात होते.

    १५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

    मोटारसायकलवरून जाताना महाराणा प्रताप चौकाच्या जवळ असणाऱ्या हॉटेल शालिमार समोर ट्रक क्रमांक (एम. एच.२० इ.जी.९४९५) सोबत भीषण अपघात झाला.

    आक्षेपार्ह पोस्ट कराल तर तुरुंगात जाल, छ. संभाजीनगरात सोशल मीडियावर पोलिसांची नजर
    शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी गाव घेतली. त्यानंतर गंभीर जखमी दोन्ही युवकांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

    दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये उच्चशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं
    ट्रकची धडक इतकी जोरदार होती, बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. शहरातून खरेदी करुन परत आपल्या गावी जाताना दोन भावांवर काळाची झडप पडली. दोन भावांपैकी एक जण १८ तर, दुसरा ९ वर्षांचा होता. दोन सख्ख्या भावांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed