• Mon. Nov 25th, 2024
    पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट

    मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, इतके आमदार निवडून आले होते. पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. आम्ही त्यावेळी आर. आर. पाटील यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केलं होतं, मात्र तसं घडलं नाही, असं अजित पवार म्हणाले.पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्ष काम केलं. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आम्ही एकत्रित चांगलं काम केलं, असं अजित पवार म्हणाले. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये अजित पवार बोलत होते.

    कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केलं, परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला.

    दरम्यान, ‘माझ्याबद्दल शंका-कुशंका मनातून काढा. मी गेली ३२ वर्ष राजकारणात आहे. नियोजित कार्यक्रमांना आम्ही जात असतो. त्यामुळे मी इकडे गेलो, तिकडे गेलो, असं करु नका. एका दैनिकाच्या कार्यक्रमासाठी मी पुण्यात असल्याने पक्षाच्या मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नही’ असं अजित पवार आज सकाळी म्हणाले होते.

    दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला
    ‘सामना’तील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर दबाव असल्याचा दावा केला होता. तसेच भाजपसोबत त्यांच्या कथित चर्चेविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही ‘आमची वकिली करु नका’ अशा शब्दात संजय राऊतांना अप्रत्यक्षरित्या सुनावलं होतं. त्यानंतर सकाळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी थेट ‘कोण संजय राऊत?’ असं विचारत संतापही व्यक्त केला होता.

    त्यानंतर संजय राऊत यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो, ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत, गोड माणूस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांचे गोडवे गायले.

    पुण्यातील गुंड शरद मोहोळची पत्नी भाजपात, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed