• Mon. Nov 25th, 2024

    ट्राफिक जॅममधून मार्ग काढण्यासाठी कल्याणमधील प्रवाशांचा साहसी खेळ, पाईपमधून बाईकची वाहतूक

    ट्राफिक जॅममधून मार्ग काढण्यासाठी कल्याणमधील प्रवाशांचा साहसी खेळ, पाईपमधून बाईकची वाहतूक

    कल्याण : कल्याण रस्ता वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा विषय ठरतो आहे. प्रवासी वाहतूक कोडींमुळे त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त काही दुचाकीस्वार जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेने भल्या मोठा पाईप मधून गाडी चालवत आहेत. तर दुसरीकडे घारिवली गावाजवळ लावण्यात आलेल्या डिव्हायरमुळे तब्बल एक किलोमीटरचा वळसा घालून पुन्हा गावाकडे यावं लागत आहे. याविरोधात आज घारीवली ग्रामस्थांनी आंदोलन केलंकल्याण शीळ रस्त्याजवळ असलेल्या घारिवली गावातील नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत घारीवली गावाजवळ बांधण्यात आलेल्या डिव्हायडर विरोधात आंदोलन केलं. कल्याण शीळ रोडवर घारिवली गावाजवळ डिव्हायडर बांधण्यात आला आहे. यापूर्वी घारिवली गावात जाण्यासाठी कट रस्ता होता, मात्र आता डिव्हायडर बांधल्यामुळे ग्रामस्थांना गावाकडे वळण्यासाठी थेट कोळेगावाच्या दिशेने जात पुन्हा मागे यावं लागतं. त्यामुळे हा डिव्हायडर काढून टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

    १५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

    आज कल्याण शीळ रोडच्या एका बाजूला उभं राहून ग्रामस्थांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे. यावेळी एमएसआरडीसीने गावात जाण्यासाठी डिव्हायडर छेदून पूर्वीसारखा रस्ता करुन द्यावा अशी मागणी घारिवली ग्रामस्थांनी केली आहे. मानपाडा पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सात दिवसात यावर मार्ग निघेल असं आश्वासन दिलं, त्यानंतर ग्रामस्थानी आंदोलन मागे घेतलं.

    भर उन्हाळ्यात मुंबईकरांचा सुखद प्रवास होणार, मेट्रोने घेतला मोठा निर्णय, ७, २A मार्गावर…
    तर दुसरीकडे कल्याण शीळ रोडवर सकाळ सायंकाळच्या सुमारास देसाई गाव, कटई नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आधीच वाहतूक कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास देसाई गाव परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही लोकांनी चक्क विरुद्ध दिशेने दुचाकी नेल्या.

    इतकंच नाही, तर कल्याण शीळ रोडवर असलेल्या देसाई गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या भल्या मोठ्या पाईपमधून दुचाकी चालवल्या. हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *