• Mon. Nov 25th, 2024

    दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला मारली टपली आणि पुढे गेला, जाब विचारताच घडले धक्कादायक

    दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला मारली टपली आणि पुढे गेला,  जाब विचारताच घडले धक्कादायक

    डोंबिवली :डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा चौकात सकाळच्या सव्वा सातच्या सुमारास किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकास दोन व्यक्तींनी धारधार चाकूने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर हल्ला करून दोन अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यात रिक्षाचालक सिताराम शेवाळे हे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच रिक्षा चालकावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आरोपी विरोधात त्वरित रामनगर पोलीस ठाण्यात (भादवी कलम ३२६ आणि ३४ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्या दोन आरोपीचा शोध रामनगर पोलिसांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे रिक्षाचालकाला डोक्यात टपली मारली म्हणून हा सर्व प्रकार घडला आहे.

    दुर्दैवी! कर्जाचा बोजा वाढतच गेला, माजी सरपंच शेतकऱ्याला चिंतेने घेरले, शेवटी घडायला नको तेच घडले
    रिक्षाचालक सिताराम शेवाळे हे सकाळच्या ७.१५ मिनिटाच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील स्टेशन जवळील इंदिरा चौकात आले होते. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींनी रिक्षा चालकास डोक्यात टपली मारून पुढे गेले. यांचा जाब चालक सिताराम यांनी विचारला असता. त्यांना संबंधित दोन आरोपीकडून मारहाण केली आणि हातावर चाकूने हल्ला केला आहे. यात सिताराम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

    धक्कादायक! एकटेच पेंशन खाता, मला देत नाही; निवृत्त डीवायएसपींना मुलाची मारहाण, पत्नीने पकडले हात
    दरम्यान ही घटना होताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यात विशेष म्हणजे घटनास्थळी बरेचसे रिक्षा चालक उपस्थित असूनही कोणीही रिक्षा चालक त्यांच्या मदतीस आला नाही. तसेच आरोपींची दुचाकी भर रस्त्यावर असूनही कोणीही त्या दुचाकीच्या नंबर प्लेटचा फोटो काढला नाही. यामुळे अशी कोणती घटना घडत असताना नागरिकांनी संबंधित व्यक्तीची मदत करत किंवा वाहनाच्या प्लेटचा फोटो काढला पाहिजे असे आवाहन रामनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
    धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची चुरस वाढली; कोण बाजी मारणार, आघाडी की भाजप?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *