• Fri. Nov 29th, 2024

    विश्वासाने सोने दिले पण त्यानेच दगा केला, कारागिराने २६ लाखांचे सोने ढापले, सराफाची फसवणूक

    विश्वासाने सोने दिले पण त्यानेच दगा केला, कारागिराने २६ लाखांचे सोने ढापले, सराफाची फसवणूक

    Pune Crime News: दागिने घडवणाऱ्या कारागिरानेच २५ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सराफा व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे.

     

    म. टा. प्रतिनिधी, पुणेःसोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांनी २६ लाख रुपयांचे दागिने ढापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारागिरांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून सराफ व्यावसायिकाची फसवणूक केली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी एका कामगारास अटक केली असून, साथीदाराचा शोध सुरू आहे.संतोष रघुनाथ गायकर (रा. पिंरगुट) असे अटक केलेल्या कारागिराचे नाव आहे. या प्रकरणी गायकर याच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सराफ व्यावसायिकाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सराफ व्यावसायिक असून, त्यांचा पर्वती भागात दागिने घडवून देण्याचा व्यवसाय आहे. सराफ व्यावसायिकाच्या पेढीत आरोपी गायकर कामगार आहे.

    सराफ व्यावसायिकाने गायकर याच्याकडे दागिने घडविण्यासाठी २६३ ग्रॅम सोने दिले होते. गायकरने १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने घडवून घेतले. उर्वरित १५८ ग्रॅम सोन्याचा अपहार केला. गायकर याच्या साथीदाराकडे ८६६ ग्रॅम सोने देण्यात आले होते. त्याने ५६० ग्रॅम वजनाचे दागिने घडवून सराफ व्यावसायिकाला दिले आणि ३०६ ग्रॅम सोन्याचा अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गायकरला अटक केली असून, साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed