राज्यातील राजकारण अत्यंत अस्थिर असून विरोधी पक्षातील नेतेही अस्थिर असल्याचं माणिकराव कोकाटे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. भाजपाला अपेक्षित यश मिळत नाही त्यामुळं राष्ट्रवादी हा भाजपसाठी पर्याय असणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणे एवढा एकच पर्याय सध्या भाजपकडे आहे, असं कोकाटे म्हणाले. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही हे माहित नाही मात्र भाजपला याचा फायदा होईल असं वक्तव्य नाशिक मधील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर नाशिक सह संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं. राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी आम्ही अजित पवारांना भेटलो. आम्ही २० मिनिटं चर्चा केली त्यानंतर मी विचारलं दोन दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही अजित पवारांना भेटलो. २० मिनिट आम्ही चर्चा केली त्यानंतर मी सगळं काय चाललं आहे, नॉटरीचेबल असण्याबाबत विचारले त्यांनी या अफवा असल्याचे सांगितले. आम्ही पक्षाचे आमदार आहोत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील आम्ही त्यासोबत राहू, असेही यावेळी राष्ट्रवादीचे आमदार कोकाटे म्हणाले.
जाहिरातीवर खर्च, सभांसाठी गर्दी; शिंदे-फडणवीसांना अजित पवारांनी धारेवर धरलं
अजित पवार भाजपसोबत गेल्यास आम्ही त्यांच्यासोबत
भाजपसोबत जाण्यासंदर्भात दादांच्या बोलण्या वागण्यातून काहीही तसेच जाणवलं नाही. आता आमचे आमदार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. अजितदादा भाजप सोबत जाणार असतील तर आम्ही पक्षासोबत आणि दादांसोबत जाणार असं कोकाटे म्हणाले. राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे असतात, असेही कोकाटे बोलताना म्हणाले. सध्या दादांच्या बरोबरीचा राष्ट्रवादीत एकही नेता नाही. मी कोणाचं नाव घेणार नाही, अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षात काहीच राहणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
अण्णा बनसोडे काय म्हणाले?
संपूर्ण महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी अजित पवार यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं माहिती आहे. यापुढं अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं अण्णा बनसोडे म्हणाले.