पुणे :पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यातील विंझर गावात मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र तरुणाई कुठे ऐकणारी? गौतमीचा कार्यक्रम आणि धिंगाणा हे समीकरण तर ठरलेलेच.तरुणाईने गौतमीच्या नादात खुर्च्या डोक्यावर घेऊन देखील नाचायला सुरुवात केली आणि तो धिंगाणा आवरण्यात वेल्हा पोलिसांची तर दमछाक झालीच. मात्र या तरुणाईला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठचार्जही करावा लागला. काही करून तरुणाई काही ऐकायचे नाव घेत नव्हती, म्हणून पोलिसांनाच गौतमीचा हा कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.
योग्य नियोजनामुळे काही ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात कुठलाही गडबड गोंधळ न होता कार्यक्रम शांततेत पार पडतो. मात्र आता पुन्हा एकदा तिच्या कार्यक्रमात राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तरुणाईमध्ये गौतमी पाटीलची मोठी क्रेझ असल्याने तिच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर धिंगाणा पहायला मिळतो.

खेड, शिरुर, दौंड आणि बारामती तालुक्यात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम शांततेत पार पडला होता. या ठिकाणी महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाला होता. मात्र रविवारी वेल्हे येथे झालेल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. तरुणांनी काही ठिकाणी खुर्च्या देखील उचलून घेतल्याचे पहायला मिळाले. मात्र या गोंधळामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वेल्हे तालुक्यात झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा राड्यामुळे गालबोट लागले.