• Sat. Sep 21st, 2024

आठवड्याभरात साताऱ्यातील आणखी एका जवानाला वीरमरण, कर्तव्यावर असताना घडली दुर्दैवी घटना

आठवड्याभरात साताऱ्यातील आणखी एका जवानाला वीरमरण, कर्तव्यावर असताना घडली दुर्दैवी घटना

सातारा:वडूज येथील जवानाचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयुर जयवंत यादव (वय २९) असं या जवानाचं नाव आहे. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारासोबत जात असताना स्पीड ब्रेकरवरून जवान मयुर जयवंत यादव हे खाली पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला (पंजाब) येथील दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच वडूज शहरावर शोककळा पसरली. मृत मयुर यादव यांचे पार्थिव मंगळवार १८ रोजी दुपारी बारापर्यंत वडूजमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयुर जयवंत यादव हे १४५ बटालियनमध्ये लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. अंबाला (पंजाब) येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारांसोबत जात असताना स्पीड ब्रेकरवरून मयुर हे खाली पडले असता त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी अंबाला (पंजाब) येथील दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

जवानांच्या गावावर शोककळा, भारत-चीन सीमेवर रेकी करताना मोरवणे गावचे सुपुत्र अजय ढगळे शहीद

मृत जवान मयुर यादव यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच वडूज शहरासह विद्यालयावर शोककळा पसरली होती.

मृत जवान मयुर यादव यांच्या पश्चात वडील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक जयवंत यादव, आई, भाऊ हर्षद, पत्नी, तीन वर्षांची आदविता ही मुलगी आहे. अंबाला (पंजाब) येथून त्यांचे पार्थिव दिल्लीतून विमानाने पुणे येथील विमानतळावर मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत पोहचणार आहे. पुणे येथून वाहनाने वडूजमध्ये दुपारी बारापर्यंत त्यांचे पार्थिव पोहोचेल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. पार्थिवासोबत त्यांचे भाऊ हर्षद यादव आणि मिल्ट्रीचे ऑफिसर आहेत.

जवानाला २२ व्या वर्षी वीरमरण; अंत्यसंस्कारापूर्वी आर्कविवाह; निरोप देताना कुटुंबाचा आक्रोश
साताऱ्याच्या तेजस मानकर जवानाचा सेवा बजावताना मृत्यू

नुकताच सातारा जिल्ह्यातील करंदोशी (ता. जावळी) गावचा तेजस लहुराज मानकर (वय २२) या जवानाला पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावत असताना डोक्यात गोळी लागली. त्याला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान, तेजस यांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांपूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाला होता. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची पंजाब भटिंडा येथे नियुक्ती करण्यात आली होती. रविवारी तेजस यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील जवान शहीद होण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.

साताऱ्यातील अवघा २२ वर्षीय जवान शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रा साजरा करून गेला अन् घात झाला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed