मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास अल्पवयीन मुलगी आंघोळीसाठी गेली होती. त्यानंतर आरोपी मागून आला आणि तिने अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आरोपीला हे करताना अल्पवयीन मुलीने पाहिले. यानंतर पीडितेने बाहेर येऊन तिच्या नातेवाइकांना याची माहिती दिली.मुलीचे म्हणणे ऐकून सर्वांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कपिलनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४(क), पोटकलम १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कपिलनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीला वेळीच घटनेची माहिती मिळाल्याने हा पुढं होणारा मोठा अनर्थ टळला, अन्यथा मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होण्याची दाट शक्यता होती. संबंधित मुलगी वेळीच सावध झाल्यानं पुढं येणारं संकट टळलं.
नागपूरमध्ये गेल्या १० दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना उघडकीस आली होती. त्यावेळी विवाहित महिलेने तिचा दुसरा पती ती आंघोळीला गेल्यानंतर व्हिडिओ शुट करत असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.
दरम्यान, नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस आता गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करतात हे पाहावं लागणार आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या