• Mon. Nov 25th, 2024
    भरदिवसा भाजप कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर गोळीबार, नाशकात खळबळ

    नाशिकःएकेकाळी धार्मिक शहराची ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता गुन्हेगारीने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. महिनाभराच्या अंतराने नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बाजीप्रभू चौकात भाजप कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत भाजप पदाधिकारी राकेश कोष्टी जखमी झाले आहेत. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळतातच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. तर एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे जया दिवे असे नाव आहे . त्याचबरोबर मुख्य हल्लेखोरासोबत असलेल्या आणखी काही त्याच्या साथीदारांचे देखील नाव निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.

    नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

    आपसातील वादातून ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या भरवस्तीत ही गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संशयित हल्लेखोरांकडून दोन राउंड फायर करण्यात आले असून त्याच्या केस (काडतूस) देखील पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला तो भाजप कामगार आघाडीचा शहराध्यक्ष होता. या घटनेची माहिती पसरतातच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

    एन्काउंटरच्या आधी असद अहमद दीड महिने महाराष्ट्रात, काही दिवस पुण्यात मुक्कामी
    गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या राकेश कोष्टीच्या पोटाला गोळी लागल्याचे देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे. एका खाजगी रुग्णालयात कोष्टीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून या प्रकरणाचा पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्यात येईल अशी देखील माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

    दुर्दैव! अचानक पाऊस आला, ती धावत-धावत वाळत घातलेले कपडे काढायला गेली, तिथेच घात झाला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed