• Mon. Nov 25th, 2024
    भावाची हत्या करुन ३३ वर्षांपासून फरार, पोलिसांना कुणकुण; गोपनीय माहिती मिळाली अन्…

    जळगाव: धरणगाव तालुक्यातील वाघळूद बु. येथे आपल्या चुलत भावाची हत्या करून मागील ३३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपी कैलास रूपसिंग पाटील (वय ५५) याला धरणगाव पोलिसांनी अखेर शोधूनच काढले आहे. मोठ्या शिताफीने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धरणगाव पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातील नवसारी येथून अटक केली आहे.

    ३३ वर्षापूर्वी कैलास पाटील याने आपल्या चुलत भावाची हत्या केली होती. तेव्हापासूनच तो फरार होता. न्यायालय प्रत्येक तारखेला पोलिसांना आरोपीला अटक का नाही?, याची सतत विचारणा करत होते. त्यामुळे धरणगाव पोलीस मागील ३३ वर्षापासून आरोपीला अटक करण्याच्या मुद्द्यावरून मोठ्या दबावात होते. अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा भागाचे ऋषीकेश रावले यांनी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांना फरार आरोपी यास अटक करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते.

    भरदिवसा भाजप कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर गोळीबार, नाशकात खळबळ
    पोलीस अनेक ठिकाणी फिरले मात्र रिकामे हाती परतले

    त्यानुसार पोलीस निरीक्षक ढमाले यांनी पोलीस उपनिरीक्षक जीभाऊ पाटील, संतोष पवार, राजेंद्र पाटील, राहुल बोरसे, जितेंद्र भदाणे, गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तपासाबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. हे कर्मचारी आरोपी कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्यासाठी मोती पवार आणि राजेंद्र कोळी हे देखील मागील एक महिन्यापासून अनेक ठिकाणी फिरत होते. त्यानंतर अखेर एका गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा गुजरात राज्यातील नवसारी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी तातडीने गुजरात राज्यात रवाना झाले.

    स्थानिक पोलिसांची मदत घेतल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांनी सापळा रचून त्याला आरोपी कैलास पाटील याला ताब्यात घेतले. गुजरात मधील कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला धरणगाव येथे आणले. आरोपी कैलास याला अटक केल्यावर पोलीस आधिकरी आणि कर्मचारी या सर्वांचा जीव भांड्यात पडला.

    आरोपी फरार असल्यापासून तो गावातील आपल्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात नव्हता. त्याचा कोणताही मोबाईल नंबर उपलब्ध नव्हता. तरी देखील धरणगाव पोलिसांनी आरोपीला शोधून काढले हे विशेष!

    मुंबई इंडियन्सचे खेळाडू कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी महिला संघाची जर्सी घालणार, काय आहे कारण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed