• Sat. Sep 21st, 2024
स्वप्नं पूर्ण करायची राहून गेली,जगायचं राहून गेलं; मन सुन्न करणाऱ्या अपघाताने सर्वकाही हिरावलं

पुणे:पुण्यासह राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळाला. अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच मुंबई हून पुण्याला गोरेगाव येथे ढोल ताशा पथक कार्यक्रम सादर करण्यासाठी आली असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात रात्री त्यांनी कार्यक्रम साजरा केल्यानंतर त्यांचा संपूर्ण मुले आणि मुली एका खासगी बसने मध्यरात्री मुंबईकडे जाण्यासाठी निघाले. रस्ता रिकामा असल्याने वाहन चालक वेगाने गाडी चालवत असावा, लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर बोर घाटामध्ये एका वळणावर पहाटे साधारण चार वाजण्याच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. यामुळे साखरझोपेत असलेले सर्व मुला-मुलींना काही कळायच्या आत ही दुर्घटना घडली. त्यामुळे काही जणांना झोपेतच आपले प्राण सोडावे लागले. तर काहींना मदतीविना काही वेळ दरीतच थांबावे लागले. या घटनेने सर्वांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरीतून बाहेर काढल्यानंतर लहान मुलं तहानेने व्याकुळ, खूप गयावया करुनही ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही कारण…

या बसमध्ये प्रवास करणारे सर्व मुलं-मुली ही तिशीच्या आतमधील आहेत. प्रत्येक जण आपल्या घरासाठी काही तरी करता यावे यासाठी काम करतात, शिक्षण घेऊन हे वाजवण्याची कामे करतात. काही जणांवर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असल्याची माहिती देखील जवळच्या नातेवाइकांनी दिली आहे. आपणही काही तरी करावे यासाठी या पथकत वाजवण्याची कामे करतात. या अपघाताने सेवा सामान्य घरातील मुलांचे मोठे नुकसान झाले असून ही हानी कधीही भरून न येणारी आहे. अनेकांनी आपल्या मनाशी बाळगली स्वप्न अपूर्ण राहिल्याचा भावना मनाशी घर करून ठेवल्या. या पथकातून कुणाचा कॉलेजचा खर्च, कुणाचा घराला हातभार मिळत असे. मात्र, अचानक झालेल्या अपघातानं सर्वांनाच सुन्न केलं. आई वडिलांच्या हाताखाली आलेल्या मुलांना त्यांना डोळ्यादेखत पहावा लागलं. या अपघाताने राज्यासह देशातून हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईतील ढोलताशा पथक झोपेत असताना बस १५० फूट खोल कोसळली, बोरघाटातील दरीतून थरकाप उडवणारा किंकाळ्यांचा आवाज

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विटवरुन आपला शोकसंदेश प्रसिद्ध केला. महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातात जखमी झालेले लवकर बरे होतील अशी मी आशा व्यक्त करतो. अपघातग्रस्तांना राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे. रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून रु. २ लाख आणि जखमींना रु. ५०,००० अशी मदत पुरवण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed