अशी झाली होती ओळख;ओळखीतून घातला गंडा
आरती सेवानी यांच्या मैत्रिणीच्या घरी हेल्थ केअर सेंटर आहे. २०१७ पासून आरती सेवानी या त्याठिकाणी ट्रीटमेंटसाठी जात होत्या. त्यावेळी ज्योती गायकवाड या महिलेशी ओळख झाली. मोठ्या मुलीला कॅन्सर असल्याने ज्योती गायकवाड या महिलेने आरती सेवानी यांच्याकडे दीड लाख रुपये मागितले. काही दिवसांनी ते पैसे मागायला सुरवात केल्यानंतर ज्योती गायकवाड हिने तिचा भाऊ योगेश अय्यर याच्याशी आरती यांची ओळख करून दिली. तो मुंबईत कस्टम विभागात कामाला असून तेथील सोन्याची नाणी कमी किमतीत मिळवून देतो, असे सांगितले.
सुरुवातीला एक सोन्याचं नाणं दिलं
संशयित आरोपीनं तीन लाख रुपयांत दहा तोळे देण्याचे आमिष दिले. त्यानंतर स्वतः:चे दागिने गहाण ठेवून व नणंदेकडून एक लाख, असे तीन लाख रुपये योगेश अय्यर याला दिले. त्यावेळी १०० ग्रॅमचं सोन्याचं एक नाणं त्यांनी आरती सेवानी यांना दिलं.यामुळे आरतीचा विश्वास बसला. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी ज्योती गायकवाड ही घरी आली. सोन्याच्या नाण्यांचा व्यवसाय करण्याचा सल्ला तिने आरती सेवानी यांना दिला. त्यानंतर ८ दिवसांनी आरोपी गायकवाड यांनी आणखीन सोने असल्याचे सांगत फिर्यादीला याबाबतचा व्यवसाय करण्यास फिर्यादी सेवानी यांचा आरोपी गायकवाडवर विश्वास बसल्याने त्यांनी आपल्या ओळखीतील लोकांकडून सोन्याच्या नाण्यासाठी ऑर्डर घेऊ लागल्या. दरम्यान, ज्योती गायकवाड हिने २२ सोन्याची नाणी आणि ६० सोन्याच्या नाण्याचं जॅकेट मिळत, असे सांगितले.
आरती सेवानी यांनी विश्वास ठेवत 2 कोटी पन्नास हजार रुपये दिले
संशयित आरोपी ज्योती गायकवाड हिने दुसरा सल्ला आरती सेवानी यांना दिला. एक सोन्याचं नाण गोल्ड कॉइन न घेता एकदम २२ सोन्याची नाणी आणि ६० नाण्याचं जॅकेट घ्यायला सांगितले. त्यानुसार आरती यांनी २०१७ ते २०२१ या काळात नातेवाईकांकडून दोन कोटी ५० हजार रुपये गोळा करून त्या तिघांना दिले. पण, त्यांनी ना सोन्याची नाणी दिली ना रक्कम परत केली. शेवटी आरती सेवानी यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.गुन्हा दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील तपास करीत आहेत.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या